Maharashtra Politics: चर्चा तर होणारच; मुख्यमंत्री शिंदेचे अजय आशर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांचे देवेन भारती

Devendra fadnavis And Eknath Shinde News: मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच भारती यांची नियुक्ती?
Eknath Shinde, Devendra fadnavis, Ajay ashar, Deven bharti
Eknath Shinde, Devendra fadnavis, Ajay ashar, Deven bhartiSarkarnama

Devendra fadnavis And Eknath Shinde News: राज्य सरकारकडून मुंबई पोलीस दलाच्या विशेष आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं पद निर्माण करण्यात आलं आहे. आणि त्यात या पदावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मर्जीतला माणूस बसविल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भारती यांच्या नियुक्तीवरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मित्र' संस्थेच्या उपाध्यक्षपदी त्यांचे निकटवर्तीय अजय आशर यांची तडकाफडकी नियुक्ती केली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) देवेन भारती यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्यामुळे एकप्रकारे शिंदेंनाच शह तर दिला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Eknath Shinde, Devendra fadnavis, Ajay ashar, Deven bharti
Satara : गद्दारांना धडा शिकविण्यासाठी लढा उभारावा लागेल... भास्कर जाधव

राज्य सरकारनं देवेन भारती यांची आता अचानक मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार यापुढच्या काळात सर्व सहपोलीस आयुक्त विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना रिपोर्ट करणार आहेत. आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मित्र' या संस्थेच्या उपाध्यक्षपदी त्यांचे निकटवर्ती अजय आशर यांची तडकाफडकी नियुक्ती केली होती. या नियुक्तीवर महाविकास आघाडीनं आक्षेप घेत जोरदार टीका देखील केली होती.

Eknath Shinde, Devendra fadnavis, Ajay ashar, Deven bharti
Uday Samant on Sanjay Raut: संजय राऊत पुढील २५ वर्ष अशाच प्रेस कॉन्फरन्स घेत राहोत..

भारतींची नियुक्ती मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम करणार?

आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारती यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच भारती यांची नियुक्ती करण्यात आल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. कारण 2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी भारती हे पोलिस सहआयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था विभागाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या राजकीय, गुन्हेगारीची चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदी नियुक्तीचा आगामी काळातील मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

अजय आशरांच्या नियुक्तीवरुन भाजपची गोची?

केंद्र सरकारच्या धर्तीवर शिंदे फडणवीस सरकारनं देखील नीती आयोगासारखा आयोग स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र असे त्याचे नाव आहे. मित्रच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, याच नियुक्तीवरुन महाविकास आघाडीनं तीव्र आक्षेप घेतला होता.

याचवेळी आशर यांची मित्रच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यास भाजपचा विरोध होता अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली होती.

आता फडणवीसांनी गृहखात्यामार्फत मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्तीकरुन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in