Ajit Pawar : ‘मास्टरमाईंड’ च्या चिथावणीनेच भाजपाचे आंदोलन ; अजितदादांचा रोख फडणवीसांकडे

Ajit Pawar : हिवाळी अधिवेशनात केलेल्या विधानावर ठाम असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra FadanvisSarkarnama

Ajit Pawar : नागपूरमधील हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या (chhatrapati sambhaji maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केलं होत.

त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावर अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. हिवाळी अधिवेशनात केलेल्या विधानावर ठाम असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

"मी केलेल्या विधानानंतर आंदोलन करणाऱ्यांमागे मास्टरमाईंड कोण आहे," असे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केला.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Mahavitaran Strike : महावितरणच्या संपात 'आप' ची उडी ; फडणवीस काय तोडगा काढणार ?

"छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत कोणताही अपशब्द वापरला नाही, इतिहासाच्या आधारावर मी हे विधान केलं आहे. त्यानंतर दोन दिवसांनी भाजपच्या काही नेत्यांनी बैठक घेऊन आंदोलन केले, माझा फोटो कसा असावा, आंदोलन कसं असावं हे ठरविण्यात आले," असे पवार म्हणाले. सुडबुद्धींने राजकारण करु नये, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Maratha Kranti Morcha : 'मविआ' नंतर आता शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

"छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे," अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे.अजित पवार यांच्या भूमिकेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपने त्यांचा निषेध केला आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला आहे.

अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता राऊत म्हणाले, "अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर मी अभ्यास केल्यानंतर बोलणार आहे," राऊत सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in