छगन भुजबळ म्हणतात, आता तयारी विधानपरिषदेची...

Chhagan Bhujbal| घोडेबाजाराला कोणी बळी पडणार नाही.
छगन भुजबळ म्हणतात, आता तयारी विधानपरिषदेची...
Chhagan Bhujbal|

मुंबई : महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर निवडून येतील आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून विधानपरिषदेसाठीही उमेदवार निवडून येतील. असा विश्वास मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणूकांच्या (Election) पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राज्यसभा निवडणूकीत जास्त उमेदवार दिला. विधानपरिषदेच्या निवडणूकीत तयारी करावी लागेल कंबर कसावी लागेल. घोडेबाजाराला कोणी बळी पडणार नाही. आमचे सर्व लोक प्रामाणिक राहतील याची खात्री आहे. असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal|
बारावीचा निकाल लागला; कोकण टॉपवर, तर मुंबई तळाला

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी डावलण्यात आली. या वरही मंत्री भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. संधी मिळाली तर सोनं करेन, हे पंकजा ताई यांचे स्टेटमेंट वाचले होते. पण त्यांना डावलण्यात आले. त्यांना संधी द्यायला हवी होती. एकनाथ खडसेंच्या बाबतीत तेच झाले. पंकजा मुंडेंनी राज्यसभेवर घेतलं जाईल वाटलं होतं. पण याचा समाजावर परिणाम होत असतो.

कोणीही कोणत्याही धर्मावर अपमानकारक बोलू नये. पण हे भारताने केलं नाही. तर भरतातील एका पक्षाच्या कार्यकर्त्यांने केले आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण देशावर परिणाम नको. काही लोक प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करत आहेत. त्या नुपुर शर्मा म्हणजे भारत नव्हे त्या फक्त एका पक्षाच्या प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लाम देशांतील लोकही सहकार्य करतील, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in