महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह होतील निवडणुका!

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्यप्रदेश रकारला ओबीसी अरक्षणासहित (OBC Reservation) निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
Chhagan Bhujbal Latest Marathi News
Chhagan Bhujbal Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्यप्रदेश रकारला ओबीसी आरक्षणासहित (OBC Reservation) निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला (Maharashtra) देखील मध्यप्रदेशप्रमाणेच न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला आहे.

या वेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील काही मंडळी न्यायालयात गेली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्टची पूर्तता करण्यास सांगितले. स्थानिक स्वराज संस्थेमधील ओबीसी आरक्षणावर गदा आली, आणि हा निर्णय महाराष्ट्रासह सर्वच राज्यांना लागू झाला. यात महाराष्ट्र सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून एक डाटा सर्वोच्च न्यायालयाला दिला. मात्र, दुर्दैवाने तो फेटाळला गेला. त्यानंतर राज्य सरकारने शांत न राहता पुन्हा एकदा समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून ओबीसींचा इंम्पिरिकल डाटा जमा करण्याचे काम सुरु आहे. मध्यप्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा संपूर्ण देशातील ओबीसींसाठी फायद्याचा ठरणार, असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal Latest Marathi News
ओबीसी आरक्षण मध्यप्रदेशला मिळाले, महाराष्ट्राला नाही; कारण सरकार निकामी आहे...

राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इंम्पिरिकल डाटा जमा करण्याचे काम चालू केले आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर डाटा देण्याची मागणी केली. मंगळवारी निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होऊ शकत नाही. त्यामुळे या दरम्यान इंम्पिरिकल डाटा जमा करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

Chhagan Bhujbal Latest Marathi News
OBC Reservation : मध्य प्रदेशात मान्यता मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही?

राज्यसरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. ते सर्व प्रयत्न यशस्वी झाले आहेत यामध्ये प्रभाग रचना राज्यांकडे घेणे अथवा समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना, अशी सर्व पाऊले राज्यसरकारने यशस्वीपणे टाकली आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी घटकाला निश्चितपणे आरक्षण मिळेल, असेही भुजबळ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com