भुजबळ म्हणतात, राणांनी ते ८० लाख कोणासाठी आणि कशासाठी घेतले; तपास तर व्हायलाच हवा!

Chhagan Bhujbal| Sanjay Raut| Navneet Rana| नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Chhagan Bhujbal demanded ED inquiry of Navneet Rana and ravi rana
Chhagan Bhujbal demanded ED inquiry of Navneet Rana and ravi rana

मुंबई : नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी केली आहे. आज जनता दरबार उपक्रमात भुजबळ यांनी राणा दांपत्याचा चांगलाच समाचार घेतला. (Chhagan Bhujbal demanded ED inquiry of Navneet Rana and ravi rana)

मंत्री नवाब मलिक यांनी ५ लाखाचा जमीन व्यवहार केला. त्याच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली, असं म्हणतात परंतु ते कुठेही काही दिसत नाही, मात्र नवनीत राणा यांनी सरळसरळ ८० लाख रुपये घेतले आहेत, याची कागदपत्रे खासदार संजय राऊत यांनी दिली आहेत असेही छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal demanded ED inquiry of Navneet Rana and ravi rana
'डी गॅंग कनेक्शन, आर्थिक व्यवहार प्रकरणी राणा दांपत्य चौकशीतून सुटलंच कसं?'

नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले ते कशासाठी घेतले, कुणाच्या वतीने घेतले याचीही मुंबई पोलिसांनी व बाकीच्या यंत्रणांनीही चौकशी करायला हवी, असेही छगन भुजबळ म्हणाले. नवनीत राणा या मागासवर्गीय आहेत याबाबत हायकोर्टाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या मागासवर्गीय नाहीत असं हायकोर्ट बोलत आहे. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. मुळात त्या मागासवर्गीय आहेत का हे प्रश्नचिन्ह आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

नवनीत राणा आमच्यावर अन्याय केला असं बोलत आहेत. काय अन्याय केला असा सवाल करतानाच तुम्ही दिवसभर काय करत होतात हे सर्वांनी पाहिले आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. पोलीस ठाण्यात अन्याय झाला म्हणतात मग पोलिसांविरुद्ध त्यांची तक्रार नाही, असे पोलीस रेकॉर्डमध्ये नमूद असल्याचे पत्र छगन भुजबळ यांनी दाखवतानाच मग यांच्यावर अन्याय काय झाला, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com