
मुंबई : केंद्रसरकार वारंवार इंधनाचे दर वाढवत असून राज्यांना जीएसटीचा परतावा देत नाही. पंचवीस रुपयांची वाढ करुन दोन रुपयांची दर कपात करायची, आणि फार मोठी कपात केल्याचा आभास केंद्रसरकारकडून निर्माण केला जात असल्याची अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.
मोदींनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.याच वेळी त्यांनी देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांवरून (Petrol-Diesel Rates) बिगर भाजप शासित राज्यांना मोदींनी सुनावलं. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली. ते म्हणाले की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत,' असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत केला. "महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 'नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे,' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.