परमबीर सिंह, सचिन वाझेवर दीड हजार पानाचं पहिलं दोषारोपपत्र दाखल

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासह एकूण ६ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
परमबीर सिंह, सचिन वाझेवर दीड हजार पानाचं पहिलं दोषारोपपत्र दाखल
Parambir singh, Sachin Wazesarkarnama

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir Singh) आणि त्यांचा सहकारी निलंबीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (sachin waze) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गोरेगाव येथील कथित खंडणी प्रकरणात परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासह एकूण ६ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वी परमबीर यांना न्यायालयाने फरार घोषित केल्यावर ते अचानक मुंबईत येऊन दाखल झाले. त्यानंतर त्यांचा या प्रकरणात जबाब नोंदवण्यात आला होता. १ हजार ८९५ पानांचे दोषारोपपत्र किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. तब्बल २३१ दिवसांनंतर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. या प्रकरणाची चैाकशी चांदीवाल समिती करीत आहे. गेल्या आठवड्यात वाझे, परमबीर सिंह हे समोरासमोर आले होते.

परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ३ खंडणीचे गुन्हे तर एक अ‍ॅट्रॉसिटी आणि अधिकार्‍यांना धमकावले असल्याचा गुन्हा आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ५ आरोपींपैकी परमबीर सिंह, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू हे आरोपी आहेत. सचिन वाझे, परमबीर सिंह, अल्पेश आणि चिंटू यांच्याविरोधात या प्रकरणातील पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Parambir singh, Sachin Waze
आदित्य ठाकरेंनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या यामध्येही ढवळाढवळ करत होते असाही आरोप त्यांनी केला होता. अँटेलिया प्रकरण समोर आल्यानंतर आणि त्यातला सचिन वाझेचा सहभाग आणि इतर सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाने समोर आणल्या. ज्यानंतर त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांना डी.जी. होमगार्ड हे पद दिलं. परमबीर सिंह गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता होते. आता मुंबईत दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.