शिवसेनेच्या निर्णयांमध्ये फेरफार : नाराज किशोरी पेडणेकरांचे आयुक्त चहल यांना पत्र!

शिवसेनेसाठी प्रशासनाची ही भूमिका अडचणीची ठरत आहे, त्यामुळे पेडणेकर यांनी थेट आयुक्त चहल यांना पत्र लिहून नाराजी दर्शविली आहे.
Kishori Pednekar-Iqbal Singh Chahal
Kishori Pednekar-Iqbal Singh ChahalSarkarnama

मुंबई : मुंबई (Mumbai) महापालिकेत शिवसेनेच्या (shivsena) पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये प्रशासकाकडून फेरफार करण्यात येत आहे. तसेच, काही निर्णय रद्द करण्यात येत आहेत, असा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याकडून करण्यात येत आहे. पेडणेकर यांनी याबाबत प्रशासकपदी असणारे मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्ती केली आहे. दरम्यान, आयुक्त चहल यांनी कोणताही निर्णय रद्द करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Changes in Shiv Sena's decisions : Kishori Pednekar's letter to Commissioner Chahal!)

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे. त्यानंतर मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ मधील कलम ६ क (१) व (२) मधील तरतुदीनुसार आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची महापालिकेत प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. चहल यांच्या नेतृत्वाखाली सध्या महापालिकेचा सर्व कारभार होत आहे.

Kishori Pednekar-Iqbal Singh Chahal
लाकडी-निंबोडी योजनेस मी विरोध कसा करू : राष्ट्रवादी आमदार मानेंच्या भूमिकेने संतापाची भावना!

गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्यात येत आहे. तसेच, काही निर्णय रद्द करण्यात येत आहेत, असे सांगून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी २०१७ -२२ या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित खात्यांकडून प्रशासकाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येत आहेत, असे महापौर पेडणेकर यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेनेसाठी प्रशासनाची ही भूमिका अडचणीची ठरत आहे, त्यामुळे पेडणेकर यांनी थेट आयुक्त चहल यांना पत्र लिहून नाराजी दर्शविली आहे.

Kishori Pednekar-Iqbal Singh Chahal
बिगूल वाजला : राज्यातील १३ महापालिकांमधील आरक्षण सोडत ३१ मे रोजी!

ते उचित ठरणारे नाही : पेडणेकर

नव्या नगरसेवकांसह महापालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांनी महापालिका, स्थायी समिती किंवा इतर समित्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय घेणे उचित ठरणारे नाही, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चहल यांना लिहलेल्या पत्रात म्हटलेले आहे.

कोणताही निर्णय रद्द केलेला नाही : चहल

आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राला उत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली आहे. स्थायी समिती किंवा विविध समित्यांनी घेतलेला कोणताही निर्णय आजतागायत रद्द करण्यात आलेला नाही, असे चहल यांनी स्पष्ट केले. ही गोष्ट माजी महापौरांनाही सांगितल्याचे चहल यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com