मोठी बातमी : राज्यात भाजपचं सरकार कधी येणार? राणेंनी सांगितला मुहूर्त

भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणार, असं भाकित सातत्याने केले जाते.
मोठी बातमी : राज्यात भाजपचं सरकार कधी येणार? राणेंनी सांगितला मुहूर्त
Uddhav Thackeray, Narayan Ranesarkarnama

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात भाजपचं सरकार लवकरच येणार असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही नवीन वर्षात राज्यात सत्ताबदल होईल, असं विधान केलं होतं. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही सत्ताबदलाचा मुहूर्त सांगून टाकला आहे.

जयपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना राणे यांनी महाराष्ट्रात भाजपचं सरकार कधी येणार, याचं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यानं तिथली स्थिती अशी बनली आहे. पण मार्च महिन्यात भाजपचं सरकार बनल्यानंतर तिथे अपेक्षित बदल दिसतील, असं सांगत राणे यांनी मार्च महिन्याचा मुहूर्त सांगितला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Uddhav Thackeray, Narayan Rane
निमित्त संविधान दिनाचे अन् पंतप्रधान मोदींनी लक्ष्य केलं गांधी घराण्याला!

पुढे बोलताना राणे यांनी सरकार पाडण्यासाठी आणि बनवण्यासाठी काही गोष्टी सिक्रेट ठेवाव्या लागतात. माझ्या मनात ती गोष्ट आहे, ती बाहेर काढू इच्छित नाही, असं म्हणत राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. हे सिक्रेट नेमकं काय, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची साशंकताही व्यक्त केली जाऊ लागली आहे.

राणे यांनी यापूर्वीही सरकार लवकरच कोसळेल असं सागंतिलं होतं. राणे म्हणाले होते की, हे सरकार पाच वर्ष टिकणार नाही. भ्रष्टाचारामुळे लवकरच हे सरकार पडणार आहे. एक-एक मंत्री तुरूंगात गेल्यानंतर सरकार आपोआप कोसळेल. त्यानंतर नवीन सरकार येईल. सरकार कधी पडेल, हे यांना कळणारही नाही, असं सूचक वक्तव्य राणे यांनी केलं होतं.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून हे सरकार फारकाळ टिकणार नाही, असं सांगितलं जात आहे. काही महिन्यांतच हे सरकार कोसळेल, असाही दावा केला जात होता. पण या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतरही अनेक भाजपचे नेते सातत्याने नवीन मुहूर्त सांगत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in