Chandrakant Patil : कोण म्हणालं, मनसेसोबत युती होणार? दादांचा रोखठोक सवाल

Chandrakant Patil : मनसेच्या युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही. तशी चर्चाही नाही.
Chandrakant Patil, Raj Thackeray
Chandrakant Patil, Raj Thackeraysarkarnama

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी आपली 'एकला चलो रे' अशी भूमिका जाहीर केली असली, तरी दिवाळीच्या सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित राहिले होते. यामुळे दिवाळीसणाआडून या तिन्ही पक्षांची राजकीय सूत जुळवण्याबद्दल हालचाली सुरू असल्याचे बोलले जात होते. यावर आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

Chandrakant Patil, Raj Thackeray
Eknath Shinde : आशासेविका 'वर्षा'वर धडकणार!

मनसेच्या युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही. तशी चर्चाही झालेली नसल्याचे, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.अशी युती करायची असेल तर भाजपच्या कोअर कमिटी समोर त्याचा प्रस्ताव यावा लागतो. 13 जणांची कमिटी यावर निर्णय घेत असते, त्यामुळे याबाबत कोणताही निर्णय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Chandrakant Patil, Raj Thackeray
आर.आर.आबांच्या मुलाला पुन्हा धक्का : स्वकीयांनीच केला घात

दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी युतीसंदर्भात सूचक व्यक्तव्य केले होते. जर तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले, तर आम्ही युतीसाठी तयार असू असं राजू पाटील यांनी म्हटलं नुकतेच म्हंटले होते. यामुळे आता पुन्हा एकदा मनसे - भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीच्या शक्यता वर्तण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com