'हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा : म्हणत, चंद्रकांतदादांचे आघाडीला उत्तर

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या (Congress) जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या (Congress) जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर हिमालयात जाण्यासाठी मदत करतो असे सांगत निशाणा साधला होता. त्यावर आता पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सडोतोड उत्तर दिले आहे.

या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळी ट्वीट केल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणाले, 'हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा,' असे सांगत आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrakant Patil
जयंतरावांचा शंभूराज देसाईंना सूचक इशारा : आम्ही ताकदीने लढलो; तर टिकाव लागणार नाही!

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॅलेंज दिले होते. ''कोल्हापूरमधून हे पळून आले असे विरोधक सांगत आहेत, त्यांना आज चॅलेंज आहे आपले. ज्याला कुणाला वाटते त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही ना आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या पोटनिवडणुकीत भाजपच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना डिवचत हिमालयात जाण्यासाठी रेल्वेचे तिकिट काढून दिले होते. तर काही नेत्यांनी मी हिमालयात पोहचलो असे मिम्स सोशल मीडियावर शेअर केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते, चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी सोडला जातो. तर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हटले होते की ''फुले ... शाहू ... आंबेडकरांच्या विचारांचा विजय ...कोल्हापूरची जागा जिंकली... शाहू महाराज कि जय,'' त्याच बरोबर त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा फोटो शेअर करत मी हिमालयात पोहचलो असेही म्हटले होते.

Chandrakant Patil
राज ठाकरेंनी आता कोणाची सुपारी घेतली, हे फडणवीसच सांगतील : पटोलेंचा टोला

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देखील चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना पुन्हा एकदा चॅलेंज दिले होते. आमचे नाना कदम आले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल. मी असे म्हटले होते की मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन, मी अजून लढलोच नाही ना. आमचे नाना लढले. अक्षरश: तुमच्या तोंडाला फेस आला, असे पाटील यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com