पंकजा मुंडेंची नाराजी लगेच दूर होणार नाही; पण भविष्यात विचार करु!

पंकजा मुंडे (Pankaja Munde) कार्यकर्त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यालयावर दगडफेक केली आहे
Chandrakant Patil, Pankaja Munde
Chandrakant Patil, Pankaja Mundesarkarnama

औरंगाबाद : भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजप (bjp) कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी पंकजा मुंडे नाही तर भाजपही नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केले. (Pankaja Munde Latest Marathi News)

चंद्रकांत पाटील मुंबईत बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, इच्छा असणे आणि पूर्ण झाली नाही तर हे होणे स्वाभिविक आहे. राजकारणात फुल स्टॉप नसतो. राजकारणात कधीच काही संपत नाही. मानवी स्वभावात नाराजी ही स्विच सारखी नसते. ऑन ऑफ करून जाते असे नाही.. त्यामुळे त्याला वेळ लागेल. पंकजा मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावतील, असेही पाटील यांनी सांगितले.

Chandrakant Patil, Pankaja Munde
पंकजा मुंडेंना डावलताच कार्यकर्ते आक्रमक! थेट भाजप कार्यालयावर धडकले

बीएल संतोष हे पंकजा मुंडे यांच्याशी बोलले आहेत. तसेच मी आणि देवेंद्र फडणवीस देखील बोललो आहोत. लगेच नाराजी दूर होणार नाही पण भविष्यात विचार केला जाईल, असे पाटील म्हणाले. दरम्यान, पंकजा मुंडे समर्थकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगफेकीत कार्यालयाचे नुकसान झाले. या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

Chandrakant Patil, Pankaja Munde
महाविकास आघाडी मोठा धक्का ; देशमुख, मलिकांना मतदानासाठी परवानगी नाकारली

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा उमेदवारांची घोषणा केली. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश नाही. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com