शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर चंद्रकांत पाटील म्हणतात, 'आमचे देवेंद्रजी आहेतच तसे'

Rajya sabha Elelction 2022 | Chandrakant Patil| धनंजय महाडिकांच्या विजयानंतर, जो चमत्कार झाला तो मान्य करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.
Chandrakant Patil
Chandrakant Patil

Rajya Sabha election 2022

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. पण शिवसेनेला मोठा धक्का बसयला. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला. (Rajya Sabha Election latest news) धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार यांनी केलेल्या भाजपच्या कौतुकानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी ट्विट करत शरद पवार यांचे आभार मानले आहेत. '''माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला' ही शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे... आमचे देवेंद्र फडणवीस जी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे.'' असं ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

"जो चमत्कार झाला तो मान्य करावा लागेल. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली. अपक्षांना वळविण्यात त्यांनी केलेली खेळी यशस्वी झाली. विरोधकांकडून रडीचा डाव खेळण्यात आला. ही निवडणूक चुरशीची झाली. या निकालाचा आघाडीसरकारवर परिणाम होणार नाही," असे पवार म्हणाले. तसेच "शिवसेनेनं संजय पवार यांना निवडणुकीत उभं केलं, राजकारणात रिस्क घ्यावी लागतेच," असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, "आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेणं हा भाजपचा रडीचा डाव होता. महाविकास आघाडीच्या कोट्यामध्ये जी मते होती, त्यात फरक पडलेला नाही, भाजपच्या एकाही मताही धक्का बसला नाही. भाजपला पडलेले अधिकच मत हे आघाडीचे नाही. भाजपच्या विजयामुळे धक्का बसलेला नाही," "मतांची संख्या पाहिली शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची मतं फुटली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांना एक मत अतिरिक्त मिळाले, याची मला कल्पना होती," असे पवार यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com