चंद्रकांतदादांनी राजू शेट्टींचे केलं कौतुक!

राजू शेट्टी यांनी वीजबिल वसुलीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
Chandrakant Patil praises Raju Shetty for Electricity bill issue
Chandrakant Patil praises Raju Shetty for Electricity bill issue

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे कौतुक केले आहे. शेट्टी यांनी वीजबिल वसुलीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. वीज पुरवठा खंडित करून दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. सरकारमध्ये असूनही सरकारविरोधी भुमिका घेतल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या निर्णयावर चोहोबाजूने टीका होत आहे. भाजप, मनसेसह विविध संघटनांनीही सरकारविरोधात आवाज उठविला आहे. महाविकास आघाडीत सहभागी असलेले राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर सरकारविरोधी भुमिका घेतली आहे. ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यास मंत्र्यांनी राज्यात फिरून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर टीका करताना शेट्टी यांचे अभिनंदन केले. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, नितीन राऊत यांना सरकारवर जबाबदारी ढकलायची असेल तर पदाचा राजीनामा द्यायला हवा. ते आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत.

कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ बिले आली. ग्राहकांनी या काळात विजेचा वापर जास्त केल्याने बील वाढले, हा त्यांचा दावा चुकीचा आहे. या बिलांमध्ये सवलत देणार असल्याचे सुरूवातीला सांगण्यात आले होते. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना पाटील यांनी सरकार फक्त मराठा,ओबीसी वाद निर्माण करत असल्याचे सांगितले. या सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही. यातून काही मार्ग निघताना दिसत नसल्याने मराठा तरूणांमध्ये नैराश्य आले आहे. याची मला भिती वाटत असल्याचे ते म्हणाले. भंडारा प्रकरणात सरकारची संवेदनशीलता संपलेली असल्याने कोणावरही कारवाई केली जात नसल्याची टीका त्यांनी केली.

निवडणूक आयोगाला भेटणार...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहीती लपविली असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे. याची दखल आयोगाने घ्यावी म्हणून त्यांना भेटणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री संपत्ती तर मुंडे मुलं लपवतात; किरीट सोमय्यांचा पुनरूच्चार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उध्दव ठाकरे यांच्यामध्ये हिमंत असेल तर त्यांनी संपत्तीचे अॉडिट करावे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीची माहिती लपविली आहे. मुख्यमंत्री संपती लपवत आहेत, तर दुसरीकडे मुंडे मुलं लपवतात, याचा पुनरूच्चार सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांच्याकडून संपत्तीच्या मुद्यावरून ठाकरे परिवारावर सतत टीका केली जात आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचे अॉडीट करण्याची मागणी केली. अन्वय नाईक प्रकरणातील मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अन्वय नाईक यांच्याकडून घेतलेल्या जमिनीची माहिती उद्धव ठाकरे यांनी द्यावी. आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली आहे. एक आठवड्याची वाट पाहून पुढची भूमिका स्पष्ट करू, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com