शरद पवार आणि संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? चंद्रकांत पाटलांचा सवाल

राष्ट्रवादी आणि शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवणार आहे, त्यावरुन पाटील यांनी निशाणा साधला.
Sharad Pawar, Sanjay Raut, Chandrakant Patil
Sharad Pawar, Sanjay Raut, Chandrakant Patilsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. तसेच गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना (ShivSena) निवडणूक लढवणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. पवार आणि राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत पाच राज्यात परिवर्तण होणारच असल्याचे सांगितले. त्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीट मध्ये पाटील म्हणाले, ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे नेते संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे, असा टोला त्यांनी लगावा. या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्यचे सांगावे. राऊत यांनी सांगावे की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील. याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी, असे आव्हान पाटील यांनी दिले.

Sharad Pawar, Sanjay Raut, Chandrakant Patil
भाजपच्या 12 निलंबित आमदारांचा हुरूप न्यायमूर्तीच्या त्या एका वाक्याने वाढलाय...

नावापुरताच महाविकास असणारे हे सरकार प्रत्यक्षात मात्र महाविरोधाभास सरकार आहे. दोन वर्षांपासून ठप्प असलेले जनजीवन आता सुरळीत होत होते. त्यावर निर्बंध लावू नयेत असे राज्यातील जनता ओरडून ओरडून सांगत होती. मात्र, या सरकारने आपला मनमानी कारभार राबवत विरोधाभासी प्रतिबंध लादले आहेत. हे सरकार जनता झोपलेली असताना संचारबंदी लावते. मात्र, दिवसा लोकल, बसेस तुडुंब गर्दी भरून वाहत असतात. मॉल, रेस्टॉरंट्स, बार, ऑफिसेस अशा वातानुकूलित जागांना परवानगी मिळते.

शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विद्यालये, क्रीडांगणे इ. जागांवर मात्र प्रतिबंध लादले जातात. राज्यातील सर्वसामान्य जनतेला या सरकारमधील गोंधळाचा नाहक त्रास भोगावा लागत आहे. सरकार मात्र कुंभकर्णाची झोप घेत असून सर्वसामान्यांचा आवाज त्यांच्या कानी पोहोचलाच नाही, अशी टीका पाटील यांनी केली. या महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्न आज उभा महाराष्ट्र विचारत आहे, असेही पाटील म्हणाले.

शरद पवार म्हणाले...

पवार म्हणाले की ''पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. त्यात मणिपूरमध्ये आम्ही पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही समाजवादी पक्षाबरोबर जाणार आहेत. त्या ठिकाणी इतर छोट्या पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. लखनौमध्ये उद्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडीबाबत चर्चा होणार आहे. त्यात कोणाला कोणत्या आणि किती जागा सोडायच्या हे ठरले जाणार आहेत. त्या बैठकीला उत्तर प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी. के. शर्मा हे जाणार आहे.

Sharad Pawar, Sanjay Raut, Chandrakant Patil
`शिवसेनेची लढाई ही त्यांच्या उमेदवारांचे डिपाॅझिट वाचविण्यासाठी`

उत्तर प्रदेशात या निवडणुकीतून परिर्वतन होणार आहे. तेथील लोकांना यंदा बदल हवा आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोक आमच्याबरोबर आहे, २० टक्के लोक आमच्यासोबत नाहीत, असे विधान केले हेाते. हे वीस टक्के कोण, हे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाहीत. मात्र त्यांची विचारधारा त्याच पद्धतीची आहे. त्यांच्या मनात जे आहेत, ते त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचार मजबूत करण्याची गरज आहे. योगी आदित्यनाथ यांच्या त्या विधानाला उत्तर प्रदेशची जनता या निवडणुकीतून उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले, गोव्यात (Goa) आमचे आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा झाली. एकत्र लढलो तर गोव्यात नक्कीच परिवर्तन घडवू शकतो. शिवसेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणे चांगले आहे. शिवसेना गोव्यात 9 जागांवर तर युपीत 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

गोव्यात भाजप मंत्री व आमदारांनी भाजप सोडला. म्हणजे गोव्यात भाजप अभेद्य नाही. युपीत भाजपच्या अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आला आहे, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी भाजपला लगावला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपने सावध राहावे. काल गोव्यासंदर्भात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक झाली. भाजपला आता लाटांचे तडाखे बसायला लागलेत. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com