Chandrakant Patil: संभाजी महाराजांवरील 'त्या'वादग्रस्त विधानावरून चंद्रकांतदादांनी आव्हाडांना सुनावलं; म्हणाले...

Chandrakant Patil On Jitendra Awhad : “..तर औरंगजेबाने विष्णू मंदिरही तोडलं असतं!”
chandrakant patil, Jitendra Awhad
chandrakant patil, Jitendra AwhadSarkarnama

Chandrakant Patil On Jitendra Awhad : छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेऊन ज्याठिकाणी त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्यानं विष्णूचं मंदिरही फोडलं असतं असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

या विधानानंतर आता भाजपसह सत्ताधारी पक्षातील विविध नेत्यांनी आव्हाडांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) खडेबोल सुनावलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी औरंगजेबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे ते पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

chandrakant patil, Jitendra Awhad
Bjp : नड्डांची सभा फ्लाॅप, भाषण सुरू असतांना लोक उठून गेले..

मंत्री चंद्रकांत पाटलांनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. पाटील म्हणाले, आव्हाड हे आता नवीन इतिहास लिहित आहे. पण तुम्ही म्हणाल तो इतिहास, असं चालणार नाही. जो इतिहास आहे, तोच इतिहास राहील. आणि राज्यातील जनता मतदानाच्या माध्यमातून तुम्ही किती मूर्ख आणि चुकीचे आहात हे दाखवून देईल अशा शब्दांत आव्हाडांना इशारा दिला आहे.

chandrakant patil, Jitendra Awhad
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदच्या अडचणी वाढणार? पुण्यात तक्रार दाखल

तसेच तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमच्याशी सहमत असणारे फार कमी आहेत. पण तुम्ही जे म्हणत आहात, त्याला चूक म्हणणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे तुम्ही मूर्ख कसे आहात, कसे चुकीचे आहात, तुम्ही इतिहास कसा बदलवायला बसला आहात, हे हजारो-कोट्यवधी लोक मतदानातून दाखवत असतात असा खरपूस समाचार देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आव्हाडांचा घेतला आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहे.याचदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं असं वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com