Chandrakant Patil : '' छगन भुजबळ जामिनावर बाहेर आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं..''

Chandrakant Patil : भुजबळ यांनासुध्दा न्यायदेवतेनं जामीन दिला आहे...
Chandrakant Patil- Chhagan Bhujbal
Chandrakant Patil- Chhagan BhujbalSarkarnama

Chandrakant Patil Latest News : भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी 11 पोलिसांचं निलंबन देखील करण्यात आलं आहे. तसेच पोलिसांकडून या शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर पोलिसांनी गंभीर कलमं लावली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करुन पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील पोलिसांच्या कारवाईवरुन शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आता भुजबळ यांनी केलेल्या टीकेला चंद्रकात पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.

Chandrakant Patil- Chhagan Bhujbal
Gopinath Munde Birthday: '' हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय..., अप्पा..'' ; धनंजय मुंडेंचं भावनिक टि्वट

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत हे त्यांनी लक्षात असू द्यावं. प्रशासनानं त्यांचं काम केलं आहे. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. भुजबळ यांनासुध्दा न्यायदेवतेनं जामीन दिला आहे, त्यामुळे त्यांनीही न्यायदेवतेवर विश्वास ठेवावा असेेहीपाटील यांनी यावेळी सांगितले.

Chandrakant Patil- Chhagan Bhujbal
Anil Deshmukh :.. तर अनिल देशमुख तेरा महिने तेरा दिवसांनी बाहेर येतील.. !

यावेळी माझ्यावरील शाईफेकीचा कट हा पूर्व नियोजित होता आणि याचे सर्व पुरावे मिळाले आहेत. माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली असा आरोप करतानाच निषेध करायला हरकत नाही, पण मग मला मारण्याचा हा प्रयत्न होता का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले..?

यापूर्वीही शाई फेक प्रकरणं अनेकवेळा घडली आहेत. आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारा फुले, शाहू आंबेडकरांचा पाईक आहे. परंतू कुणाच्या जीवाला धोका निर्माण होईल असं वागू नये हे ठीक आहे. पण, वाटेल ते बोलून आपण सुद्धा लोकांना किती पेटवणार आहात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी ज्याने शाई फेकली त्यांच्यावर 307 कलम लावलं, खुनाचा प्रयत्न? मला हे कळलंच नाही अशा शब्दांत पोलिसांच्या कारवाईवर संशय देखील व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com