काॅंग्रेसमधील खदखद बाहेर; संतप्त राहुल गांधी मोठे बदल करणार!

प्रदेश काँग्रेसमध्ये (Congress) मोठे फेरबद होणार असल्याची चर्चा
Rahul Gandhi, Chandrakant Handore
Rahul Gandhi, Chandrakant Handoresarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे (Congress) उमेदवार चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. त्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडी संदर्भात हांडोरे आणि नसीम खान यांनी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची बुधवारी दिल्लीमध्ये भेट घेतली.

या भेटीबंद्दल माहिती देताना नसीम खान म्हणाले, राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. एक दीड दोन महिन्यात जे विषय घडले ते सर्व त्यांच्या कानावर घातले आहेत. विश्वास दर्शक मतदानावेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. त्याची गंभीर दखल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतली आहे. पक्षाला झालेला दगाफटका, पक्षाविरुद्ध नेत्यांची केलेले काम हे माफी योग्य नाही, असे पक्ष श्रेष्ठींच मत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rahul Gandhi, Chandrakant Handore
शिंदे सरकारबाबत महादेव जानकरांचा मोठा दावा; म्हणाले, ‘हे सरकार...’

कारवाई करण्याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी माहिती घेत आहेत. यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत बोलावले जात आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे ४४ मते होती. पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे होते. मात्र, निवडणुकीत त्यांचाच पराभव झाला. हांडोरे यांना २९ मतांचा कोटा देण्याचे ठरले होते. त्यांना २२ मतेच पडली. त्यामुळे त्यांची ७ ते ८ मते फुटली. असे नसीम खान यांनी सांगितले.

Rahul Gandhi, Chandrakant Handore
राज्यपालांच्या भाषणात केवळ भाजप आणि मोदींचाच उल्लेख म्हणत मिटकरींचा निषेध?

नसीम खान म्हणाले, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले गेले. संभाजी महाराजाबंद्दल काँग्रेसला आदरच आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले होते. शिवसेनेने मंत्रिमंडळात प्रस्थाव आण्याआधी आम्हला विश्वासात घेतले पाहिजे होते. काँग्रसची एक विचार धारा आहे. सर्व धर्म समभाव हे काँग्रेसचे धोरण, असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत पोहोचले आहेत. राज्यातील सर्व घडामोडिंवर नाना पटोले आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in