Chandrakant Patil news : विरोधकांवर आरोप करत चंद्रकांत दादांची माफी

कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागितली अन् शाळा सुरु केल्या, असं विधान केलं होतं.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Chandrakant Patil news : भाजप नेते राज्यातील महापुरुष आणि समाजसुधारकांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी, यांच्यानंतर काल भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही असेच वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वाद ओढावून घेतला. पण आपल्या वक्तव्यावर विरोध होऊ लागल्यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.

''चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या शब्दांने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मनात श्रद्धा आहे. माझ्या रक्तात शाहु, फुले, आंबेडकर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफी मागायला हरकत नाही. पण मी इतक्या छोट्या मनाचा नाही. तुम्ही छोट्या मनाचे आहात, तुम्हाला राजकारण करण्यासाठी काहीतरी शोधायचं असतं.'' असे म्हणत त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांवरच आरोप केले आहेत.

Chandrakant Patil
Maharashtra Government : शपथविधीसाठी शिवलेल्या कपड्याचे काय ? ; मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांना प्रश्न

कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनीही शाळा सुरु केल्या. पण त्यांना शाळा सुरु करताना सरकारनं अनुदान दिलं नाही. तर,त्यांनी लोकांकडे भीक मागितली अन् शाळा सुरु केल्या असं विधान केलं होतं. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या विधानामुळे राज्यभरातून विरोध होऊ लागल्यानतंर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

पैठण येथील एका कार्यक्रमात चंद्रकात पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शाळांच्या सरकारी अनुदानावर भाष्य केलं. पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनीही शाळा सुरु केल्या. पण त्यांना शाळा सुरु करताना सरकारनं अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे शाळा चालवतोय, पैसे द्या अशा शब्दांत भीक मागितली. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com