देशमुखांना क्लिनचिट? चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता.
देशमुखांना क्लिनचिट? चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे
Chandiwal Commission submits report to CM Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगाचा (Chandiwal Commission) अहवाल मंगळवारी (ता. 26) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

चांदीवाल आयोगाची चौकशी मागील महिन्यात पूर्ण झाली आहे. सुमारे 200 पानांचा हा अहवाल आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. यावेळी गृहमंत्री वळसे पाटीलही उपस्थित होते. आयोगाने आपल्या अहवालात देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचे समजते. परमबीरसिंह यांनी केलेले आरोप कळते-समजतेच्या आधारावर असल्याचा निष्कर्षही आयोगाने काढला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकार या अहवालावरून काय पावले टाकणार हे महत्वाचे ठरणार आहे.

Chandiwal Commission submits report to CM Uddhav Thackeray
अखेर सत्य समोर! संजय पांडेंनी नवनीत राणांचा व्हिडीओ केला व्हायरल

काय आहे प्रकरण?

परमबीर सिंग यांनी मागीलवर्षी देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यांनी आरोपांचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने समितीची स्थापना केली होती. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती देशमुखांवरील आरोपांची चौकशी करीत होती. नंतर या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले.

आयोगाकडून देशमुखांसह परमबीरसिंग आणि मुंबई पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याची चौकशी केली. तिघांनाही आयोगासमोर समोरासमोर आणण्यात आले होते. देशमुख व वाझे यांची समोरासमोरच झाडाझडती घेण्यात आली. देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआयकडूनही केली जात आहे. ईडीकडून देशमुखांवर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयोगाच्या अहवालातील ठळक निष्कर्ष -

- सचिन वाझेने देशमुख किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कुठल्याही पैशाची मागणी केली नाही.

- परमबिरसिंह यांनी तक्रारीत नोंदवलेल्या अधिकाऱ्यांनीही देशमुखांकडून पैसे मागण्यात येत असल्याच्या आरोप फेटाळला आहे.

- परमबीर सिंह यांनी केलेले आरोप कळत समजतेच्या आधारावर असल्याचा निष्कर्षही आयोगानं काढल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.