Chanda Kochhar Grant Bail : न्यायालयाचा कोचर दाम्पत्याला दिलासा; सीबीआयवरही ओढले ताशेरे

सीबीआयने २३ डिसेंबर रोजी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती
Chanda Kochhar Grant Bail
Chanda Kochhar Grant Bail

Chanda Kochhar Grant Bail : मुंबई उच्च न्यायालयाने ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या कारवाईवर ताशेरे ओढत न्यायालयाने कोचर दाम्पत्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयची कारवाई कायद्याला अनुसरुन नाही, असे सांगत न्यायालयाने कोचर दाम्पत्याला हा दिलासा दिला आहे.

व्हिडिओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने शुक्रवारी (२३ डिसेंबर) संध्याकाळी ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली.  चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या नु रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली.

सविस्तर वृत्त लवकरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com