CBIचे महासंचालक जयस्वालांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई उच्च न्यायालयात सुबोध जयस्वाल (subodh jaiswal)यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.
subhod  jaiswal
subhod jaiswalSarkarnama

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने सीबीआयचे महासंचालक सुबोध जयस्वाल (subodh jaiswal) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. सुबोध जयस्वाल हे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) प्रमुख असून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. आता त्याच्या नियुक्तीलाच आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सुबोध जयस्वाल (subodh jaiswal)यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. जयस्वाल यांच्या नियुक्तीला निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र कुमार त्रिवेदी यांनीउच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबई पोलीस आयुक्त तसेच राज्याचे पोलिस महासंचालक पद भूषवल्यानंतर जैस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. सुबोध जैस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांप्रकरणात राज्य गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग करण्यात आले होते. या फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलीसांच्या सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

subhod  jaiswal
कृषी विषय राज्याचा की केंद्राचा ; प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न

त्रिवेदी यांनी याचिकेत म्हटले आहे की, आपण महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असताना जयस्वाल यांच्या सांगण्यावरून अचानक आपली गैरसोयीच्या पदावर बदली करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने बदलीचा निर्णय रद्द केला होता. त्रिवेदी यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

''भ्रष्टाचार विरोधी प्रकरणांच्या तपासाचा जयस्वाल यांना कोणताही पूर्वानुभव नाही. त्यांची विश्वासाहर्ता संशयातीत आहे. केंद्रीय दक्षता आयोग कायद्यानुसार सीबीआय संचालकपदी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचार विरोधी प्रकरणांच्या तपासाचा पूर्वानुभव असणे अनिवार्य आहे. जयस्वाल यांच्या बाबतीत हे म्हणता येणार नाही,'' असा दावाही त्रिवेदी यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com