ठाकरेंचा अनोखा 'दोस्ताना' ; राऊतांसाठी सभेत खुर्ची राखीव!

Uddhav Thackeray : संजय राऊत यांच्या पाठीशी आपण आहोत, असा संदेश दिला जात आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : दसरा मेळाव्यावरून सुरू असलेला वाद, मुंबई महापालिकेची निवडणूक या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर पहिल्यांदाच गोरेगावच्या नेस्को मैदानावर ही सभा होत आहे. या सभेची विशेष गोष्ट म्हणजे सभेच्या ठिकाणी असलेल्या विचारमंच तेथील खुर्च्यांची व्यवस्था लक्षवेधी ठरत आहे. शिवसेनेचे तडफदार नेते संजय राऊत सध्या अटकेत असून ते तुरुंगात आहेत. तरीही त्यांच्या नावाची खुर्ची शिवसेनेच्या मंचावर दिसत होती. राऊतांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आल्यामुळे यावेळी शिवसैनिकांना संजय राऊतांची स्मरण झाली.

शिवसेनेचा दसरा मेळाव्यावर वाद सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे दसरा मेळाव्याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आजच्या गोरेगाव येथून शिवसेनेचा हा दसरा मेळाव्याचा आधीची सभा म्हणून याकडेही लक्ष आहे. गोरेगावच्या नेस्को संकुल मैदानात गटप्रमुखांचा विराट मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी २१ हजार खुर्च्या ठेवण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मेळाव्याला संबोधित करत आहेत. लीलाधर डाके, अनंत गीते, भास्कर जाधव, अरविंद सावंत यांच्याबरोबरच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठीही खुर्चीच्या व्यवस्थेची चर्चे होत आहे .

Sanjay Raut
रश्मी ठाकरेंबद्दल तसं बोलायला नको होतं; रामदास कदमांना उपरती

संजय राऊत यांच्या पाठीशी आपण आहोत असा संदेश यातून दिला जात आहे, यातून देण्यात आले. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीचे शिवसेना रणशिंग फुंकणार आहे. दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in