Ramdas Athawale News: '' मोदींना हरवणं येड्या गबाळ्याचं काम नाही..''; रामदास आठवलेंचा उध्दव ठाकरेंना टोला

Ramdas Athawale Criticizes Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद संभाळतां आलं नाही आणि...
Ramdas Athawale & Uddhav Thackeray
Ramdas Athawale & Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा आहेत असं विधान केलं आहे. त्यामुळे २०२४ ला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उध्दव ठाकरे हा विरोधकांचा प्रमुख चेहरा असणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नागालँडमधील आरपीआयच्या विजयानंतर आठवले गटात उत्साह वाढत असून नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले, उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाळतां आले नाही आणि मोदी यांना हरवणे येड्या गबाळ्याचं काम नाही. तसेच उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यानं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. या बंडाला लोकांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.

Ramdas Athawale & Uddhav Thackeray
Shivsena : ठाण्यात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे-ठाकरे गटात राडा

तसेच कसबा निवडणूकीत महाविकास आघाडीला यश मिळालं असलं तरी महाविकास आघाडीने हूरळून जावू नये असा सल्ला रामदास आठवलें (Ramdas Athawale)नी दिला आहे. कर्नाटक, राजस्थान निवडणूकीत सुध्दा भाजपाला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आरपीआयमधील आजी माजी अध्यक्षांचा अंतर्गत वाद कार्यक्रमादरम्यान चव्हाट्यावर आला. मात्र, दोघांनाही सबुरीचा सल्ला आठवले यांनी देत पक्ष कार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तसेच पक्ष शिस्तीवर भर द्या अन्यथा घरात बसा असा गर्भित इशाराही दिला.

Ramdas Athawale & Uddhav Thackeray
Politics : 2024 ला उद्धव ठाकरे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदासाठीचा चेहरा असतील का?; राऊतांनी स्पष्ट सांगितलं..

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा..

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा आहेत असं विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. राऊत यांनी राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे.

आज विरोधीपक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात असंही राऊत यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com