'मानसिक संतुलन बिघडलेले संजय राऊत वातावरण बिघडवत आहे'

Narayan Rane|Sanjay Raut : राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून राज्य दिवाळखोरीत चालल आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
'मानसिक संतुलन बिघडलेले संजय राऊत वातावरण बिघडवत आहे'
Sanjay Raut, Narayan Rane sarkarnama 

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) खुर्चीसाठी हिंदुत्वाशी गद्दारी करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला आहे. बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नव्हती. मात्र, मागील दोन वर्षात शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुत्वाबाबत काय भूमिका घेतल्या, हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. सरकारचे एरवी बेकायदेशीर गोष्टीवर लक्ष असते, मात्र, संजय राऊतच्या भोंग्याला आपण काय म्हणायचे. हा भोंगा शिवसेनेचा नाही. कुणी तरी विकत घेतला आहे. तो संजय राऊत (Sanjay Raut) चालवत आहेत. मानसिक संतुलन बिघडलेले संजय राऊत वातावरण बिघडवत आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut, Narayan Rane 
...मोदीसाहेब माझी विशेष काळजी घेत आहेत : राजू शेट्टींचे वक्तव्य!

माझ्या घरासंबधीत केलेली कारवाई कायदेशीर केली गेली नाही. करण्य़ात आलेली कारवाई ही फक्त राजकारणासाठी केली आहे. पालिका आयुक्तांना केवळ माझं एकट्याचं घर दिसतंय का? इतर ठिकाणी ते डोळे झाकून फिरतात. तर मुख्यमंत्रीही त्याचप्रकारे सूडाच्या भावनेने कारवाई केली जात आहे. मात्र, अशा कारवायांना मी भीक घालत नाही. अशा कारवाई करून आम्ही शांत बसू असं त्यांना वाटतयं मात्र, त्यांचा तो गैरसमज आहे. माझ्याकडे अनेकांचे रेकॉर्ड आहेत, वेळ आली की उघडे करेन, असा गर्भित इशाराही राणेंनी शिवसेनेला दिला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून राज्य दिवाळखोरीत चालल आहे. मुख्यमंत्र्यांची जरब नसून अडीच वर्षांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी दोन तासांत उरकला आहे. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही. हे काय माझ्या अंगावर येतील या टपोरी लोकांना मी उत्तर देत नाही. पैसे मिळवण्याचे एक ठिकाण पालिका झालं असून हे मुंबईचे पैसे लुटत आहेत. तसेच, संजय राऊतच्या भोंग्याला आपण काय म्हणायचे. हा भोंगा शिवसेनेचा नसून कुणी तरी विकत घेतला आहे. तो राऊत चालवत आहेत. मानसिक संतुलन बिघडलेले राऊतांकडून वातावरण बिघडत आहे. तसेच, कोल्हापूर पॅटर्न जगातही महाविकास आघाडीने राबवला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पुढच्या निवडणूकित आमचे 160 आमदार निवडूण येतील. हे डबक्यात राहून समुद्राचे माप घेत आहेत, अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांवर व महाविकास आघाडीवक जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut, Narayan Rane 
Supriya Sule : सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला..

दरम्यान, राज ठाकरेंच्या भोंगे हटाव भूमिकेला राणेंनी पाठिंबा देत म्हणाले की, बेकायदेशीर भोंग्यांना आमचा विरोध आहे. जर कारवाई करायला माझं घर दिसते मग यांना बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का?, असा सवालही राणे यांनी सरकारला विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.