उद्धव ठाकरेंकडे बोलायला चांगले वाक्य नसतील तर मला फोन करावा...

Narayan Rane : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 403 खासदार असतील,असे राणे म्हणाले.

Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News
Uddhav Thackeray, Narayan Rane Latest Newssarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर भाजप नेते आणि केंद्रीय नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून सातत्याने टीका केली जात आहे.

दरम्यान आज पुन्हा त्यांनी ठाकरे यांना लक्ष केलं आणि त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसतील तर त्यांनी मला फोन करावा, माझ्याकडे चांगली वाक्य आहेत, अशा शब्दात राणे यांनी ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News)


Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News
'ते'स्क्रीनशॅाट अन् रेकॅार्डिंग सोशल मीडियावर टाकले तर पंतप्रधानही तोंड दाखवू शकणार नाही...

राणे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील मैदानाची परवानगी मिळेल आणि धनुष्यबाण हे चिन्हही त्यांच्याकडे राहील.चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे. मात्र उद्धव ठाकरेंना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे बोलण्यासाठी चांगली वाक्य नसतील तर त्यांनी मला फोन करावा, माझ्याकडे चांगली वाक्य आहेत,असा खोचक टोला त्यांना ठाकरेंना लगावला.

दरम्यान सेनेच्या दसरा मेळाव्याबाबत कोर्टातून निकाल लागेल. 'नाणार' प्रकल्पाबाबत बोलतांना ते म्हणाले की, कोकणातील नाणार प्रकल्प हा कोकणातच राहील. नाणार होणारच असून तो कोकणातच होईल. याबाबत कोणाचाही विरोध चालू दिली जाणार नाही. हा प्रकल्प हातातून जाणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरू असून मी स्वतः मंत्री आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बोलल्याचे त्यांनी सांगितले.

तसचे, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 403 खासदार असतील आणि गोवा, दक्षिण मुंबईत देखील भाजपचाच खासदार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News
Osmanabad : शिंदेसेना बाळासाहेब, दिघेंच्या विचारांची नाही ; तर मोदी, शहांच्या विचारांची..

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हाच संपलं असून ठाकरे देशात आणि राज्यात कुठेच दिसत नसून फक्त 'मातोश्री'च्या कक्षेतच त्यांचं अस्तित्व आहे, अशी खोचक टोलाही राणेंनी लगावला. आता राणेंच्या या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in