शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल!

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकार सुरक्षा पुरविणार
Eknath Shinde&Team
Eknath Shinde&TeamSarkarnama

मुंबई : बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना (shivsena) प्रचंड आक्रमक झाली असून राज्यात काही ठिकाणी तोडफोडीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांना त्यांच्या कुटुंबीयांची काळजी वाटत आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप (BJP) सरकार बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलेले आहे. बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना आता केंद्र सरकारने सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Central government will provide security to the families of Shiv Sena rebel MLAs)

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला हेाता, त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुरक्षा कमी केल्याचा इन्कार करत कोणाचीही सुरक्षा कमी करण्यात आली नाही, असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बंडखोर शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde&Team
एकनाथ शिंदेंच्या विरोधात पुणे, मुंबईत शिवसैनिक आक्रमक

शिवसेनेनच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेतेसाठी केंद्र सरकार पुढं सरसावले आहे. या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील ज्या आमदार, मंत्र्यांचे कुटुंबीय मागणी करतील, त्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाकडू स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेनेकडून राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Eknath Shinde&Team
मला आणि सचिन अहिरांना पाडण्याचा बंडखोर आमदारांचा डाव होता : संजय राऊतांचा गौप्यस्फोट

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहीत कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे म्हटले. तसेच, जर आमच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत त्याला जबाबदार असतील. तसेच, 'गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे,' अशी खंतही शिंदेंनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde&Team
एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ काॅंग्रेसने शेअर केलाय...

शिंदेंना गृहमंत्र्यांचे उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या आरोपानंतर गृहमंंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हे शिंदेंचा दावा फेटाळून लावला होता. राज्य सरकारने कोणत्याही आमदारांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढली नाही. आमदारांच्या घरांना सुरक्षा कायम आहे. पण आमदारांची सुरक्षा राज्यापुरती मर्यादित आहे. सुरक्षा काढण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे, असं उत्तर वळसे-पाटील यांनी शिंदे यांना दिलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com