६ जिल्ह्यांनी महाराष्ट्राचे टेन्शन वाढवले : केंद्राचे राज्याला तात्काळ पावलं उचलण्याचे निर्देश

Covid | Maharashtra | ६ जिल्ह्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त
६ जिल्ह्यांनी महाराष्ट्राचे टेन्शन वाढवले : केंद्राचे राज्याला तात्काळ पावलं उचलण्याचे निर्देश
Cm Uddhav Thackeray|Pm Narendra Modi|Sarkarnama

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात टास्क फोर्स सदस्यांसमवेत एक बैठक पार पडली. या बैठकीत तुर्तास मास्क सक्ती केलेली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी काळात मास्क सक्ती नको असेल तर जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Covid latest update)

राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन केंद्राने नुकतेच राज्य सरकारला एक पत्र पाठवलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना हे पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये राज्यातील विशेषतः ६ जिल्ह्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरियंटवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही केंद्राने दिल्या आहेत.

काय म्हटले आहे पत्रात?

राज्यात २७ मे ३ जून या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आठवड्यात २१ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाढत्या रूग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये टेस्टिंग, लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावी. तसेच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवरदेखील बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

कालच्या बैठकीत काय झाले?

मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट ६ टक्के असून राज्याच्या रेटमध्ये वाढ झाली असून तो ३ टक्के झाला आहे. या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या आणि ते व्यवस्थित आहेत हे पाहण्याचेही निर्देश दिले आहेत. याशिवाय या रूग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in