IRS Sameer Wankhede News: सीबीआय'चे वानखेडेंवर गंभीर आरोप; आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींचा सौदा...

Allegations Against Sameer Wankhede : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याच घरावर दोन दिवसांपुर्वी सीबीआयने छापा टाकला होता.
Sameer Wankhede Latest Marathi News
Sameer Wankhede Latest Marathi NewsSarkarnama

IRS Sameer Wankede CBI Raid News Update: बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याच घरावर दोन दिवसांपुर्वी सीबीआयने छापा टाकला होता. या प्रकरणी सीबीआय'च्या तपासातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सीबीआयने सीबीआयने वानखेडे यांच्यावर आरोप पत्रात गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुखकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. पण हा सौदा १८ कोटींवर आला. यात किरण गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतले होते. इतकेच नव्हे तर, वानखेडेंना इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, याचाही हिशोब देता आला नाही, तसेच फॉरेन ट्रिपचाही हिशोब देता आले नाही. असे काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. (Sameer Wankhede CBI Raid)

Sameer Wankhede Latest Marathi News
Narhari Zirval News: राजकीय घडामोडींना वेग; नरहरी झिरवळ पवारांच्या भेटीला

दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सीबीआयने वानखेडे यांना समन्स पाठवलं असून दोन दिवसात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपुर्वी समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर सीबीआयने छापेमारी केली होती.  बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. (Sameer Wankhede CBI Raid)

सीबीआयकडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरा काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील घराच्या परिसराची य़ंत्रणेकडून झाडाझडती घेण्यात आली. वानखेडे यापूर्वी एनसीबीचे मुंबई झोनचे प्रमुख अधिकारी होते. सिनेअभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याला अटक केल्यामुळे ते वादात भोवऱ्यात होते.

Sameer Wankhede Latest Marathi News
#Shorts | काँग्रेसने कर्नाटक जिंकले, कसब्यात धंगेकर नाचले |Ravindra Dhangekar | Congress |Sarkarnama

सीबीआयने त्यांची बहीण यास्मिन वानखेडे आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून 28-28 हजार रुपये जप्त केले. वानखेडे यांच्या सासरच्या घरातूनही 1800 रुपये जप्त करण्यात आले. पत्नी आणि मुलांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी तब्बल 12 तास तपास पथक कारवाई करत होते.इतकेच नव्हे तर त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा फोन सीबीआय अधिकाऱ्यांनी हिसकावून घेतल्याचं स्वत: वानखेडे यांनी सांगितलं होतं. (CBI Raid )


Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com