'सीताराम कुंटे, संजय पांडे हाजिर हो' : CBI

८ आणि ९ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश
सीताराम कुंटे- संजय पांडें
सीताराम कुंटे- संजय पांडेंsarkarnama

मुंबई : केंद्रिय तपास यंत्रणेने (CBI) राज्याचे मुख्य सचिव सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांना समन्स बजावले आहे. ८ ऑक्टोबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुंबई कार्यालयात तर कार्यकारी पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी ९ ऑक्टोबर रोजी दिल्ली कार्यालयात हजर राहण्याचे आदेश सीबीआयने दिले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी मात्र सीबीआय (CBI) चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे.

सीताराम कुंटे- संजय पांडें
शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

खरतरं, CBI ला राज्यात कारवाई करायची असेल तर संबधित राज्य सरकारची परवानगी लागते. मात्र, दिल्लीचे गृहखाते केंद्रीय गृहमंत्र्याच्या अधिकारात येते. त्यामुळे संजय पांडे यांना दिल्ली पोलिसांत ( महाराष्ट्रातील प्रकरण) उपस्थित राहण्याचे सीबीआयचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या खंडणीवसुली आरोपांची चौकशी करणार्‍या सीबीआयने या दोघांचीही चौकशी करण्यासाठी बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दूसरीकडे सीबीआयने आतापर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. त्यामुळे आता आमच्या कार्यालयात येऊन सीबीआयने चौकशी करावी, अशी विनंती सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांनी केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. याची चैाकशी सीबीआयकडून सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून पांडे व कुंटे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. ईडीकडून देखील याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्या तपासाचा एक भाग म्हणून आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com