शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्यामागे आयटी, सीबीआयचा ससेमिरा

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन प्रमुख चित्रा रामकृष्ण या एका योगीच्या सल्यानुसार महत्वाचे निर्णय घेत होत्या.
NSE Former CEO Chitra Ramkrishna
NSE Former CEO Chitra Ramkrishna Sarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्या तब्बल वीस वर्षे हिमालयातील कथित योगीच्या सल्यानुसार शेअर बाजार चालवत होता. योगीच्या नादी लागणे त्यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागानंतर (IT) आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कारवाई सुरू केली आहे. (Share Market News)

रामकृष्ण यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. आज त्यांची सीबीआयने चौकशी केली आहे. रामकृष्ण यांच्या भोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांचा फास दिवसेंदिवस आवळत आहे. सीबीआयने रामकृष्ण यांच्यासह एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे त्यांना आता परदेशात पलायन करता येणार नाही.

'सेबी'ने (SEBI) चित्रा रामकृष्ण यांच्या चौकशी प्रकरणी काढलेल्या 190 पानी आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एनएसईमध्ये कार्यरत असताना रामकृष्ण या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योगीच्या सल्ल्यानुसार त्या शेअर बाजार चालवत होत्या. त्या मागील वीस वर्षांपासून योगीच्या संपर्कात होत्या. आता त्यांच्याभोवती प्राप्तिकर विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यांच्या संपत्तीसह कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी गोपनीय माहिती योगीला दिल्याचा दाट संशय आहे. (Chitra Ramkrishna News)

हेअरस्टाईल बदलल्यास आणखी इंटरेस्टिंग दिसाल

योगीला शिरोमणी असे चित्रा रामकृष्ण म्हणत होत्या, पण त्याला कधीही पाहिले नसल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रत्यक्षात सेबीच्या तपासात त्यांनी अनेकवेळा या योगीची भेट घेतल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर दोघे एकत्रितपणे सेशल्समध्ये सहलीला गेले होते.रामकृष्ण या योगीला 2015 मध्ये अनेक वेळा भेटल्या होत्या. दोघांमधील ई-मेलच्या माध्यमातून हे उघड झाले आहे. रामकृष्ण या योगीला न भेटल्याचा दावा करीत असल्या तरी त्यांची प्रत्यक्षात भेट झाली होती. योगीने रामकृष्ण यांना 18 फेब्रुवारी 2015 रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते की, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तुम्ही हेअरस्टाईल वेगळी करायली हवी जेणेकरून तुम्ही आणखी इंटरेस्टिंग आणि अपिलिंग वाटाल. हा मोफत सल्ला असून, तुम्ही तो स्वीकाराल याची मला खात्री आहे. मार्चच्या मध्यावधीत काही दिवस मोकळे ठेवा.

सेशल्समध्ये एकत्र फिरायला

योगीने 17 फेब्रुवारी 2015 रोजी पाठवलेल्या आणखी एका ई-मेलमध्ये म्हटले होते की, तुम्ही तुमच्या बॅगा तयार ठेवा. मी पुढील महिन्यात सेशल्सला जाण्याचे नियोजन करीत आहे. तुम्ही माझ्यासोबत यायचा प्रयत्न करा. कांचन (सुब्रह्मण्यम) कांचना आणि भार्गवसोबत लंडनला जाण्याआधी तसेच, तुम्ही दोन मुलांसमवेत न्यूझिलंडला जाण्याआधी आपण जाऊन येऊ. तुम्हाला जर पोहता येत असेल तर सेशल्समध्ये डुंबण्याचा आनंद घेता येईल.

NSE Former CEO Chitra Ramkrishna
सुशांतची हत्याच अन् मातोश्रीवरील चौघांना लवकरच ईडीची नोटीस! राणेंनी टाकला बॉम्ब

मी पाठवलेले गाणे ऐकले का?

योगीने 16 सप्टेंबर 2015 रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते की, मी पाठवलेले मकर कुंडल गाणे तुम्ही ऐकले का? तुम्ही ते ऐकायला हवे. तुमच्या चेहऱ्यावर आनंद मला पाहायचा असून, तो हृदयातून आलेला असावा. मी काल तुमच्यासोबत काही काळ घालवला. अशा प्रकारच्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वत:ला तरुण आणि उत्साही अनुभवता.

NSE Former CEO Chitra Ramkrishna
सोमय्यांच्या आरोपावर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अखेर सोडलं मौन

योगीच्या सल्ल्याने रामकृष्ण यांनी 2013 मध्ये शेअर बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार म्हणून आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांची नियुक्ती केली होती. तसेच त्यांच्या वेतनातही भरमसाठ वाढ करण्यात आली. पण हे सुब्रमण्यमचं कथित योगी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पण त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत. एनएसईच्या 27 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्रात याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. रामकृष्ण यांनी मात्र योगी हाच सुब्रह्मण्यम असल्याचा दावा फेटाळला आहे. पण फॉरेन्सिक तपासणीमध्ये त्या वापरत असलेला rigyajursama@outlook.com हा ईमेल आयडी सुब्रह्मण्यमचा होता, असे सेबीच्या आदेशात म्हटले आहे. एनएसईने याबाबतचा सविस्तर अहवाल मे व जुलै 2018 मध्ये सेबीला पाठवला असून त्यामध्येही कथित योगी सुब्रह्मण्यमच होता, असे नमूद करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com