मोठी बातमी : मुंबई पोलिसांसमोर सीबीआय संचालक चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

मुंबई पोलिसांनी थेट सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
Subodh Kumar Jaiswal
Subodh Kumar JaiswalFile Photo

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करीत आहे. या प्रकरणी मागील आठवड्यात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) थेट सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दरम्यान, जयस्वाल हे चौकशीसाठी हजर राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) प्रमुख रश्मी शुक्ला यांनी बदली रॅकेट संबंधित एक रेकॉर्डिंग केले होते. त्याचा एक अहवालही त्यांनी तयार केला होता. हा अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात वाचून प्रसारमाध्यमांसमोर ठेवला होता. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तींविरोधात गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण घडले त्यावेळी जयस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक होते. नंतर त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. आता याच प्रकरणात जयस्वाल यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 9 ऑक्टोबरला सीबीआय संचालकांना समन्स बजावले. त्यांना 14 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. हे समन्स ई-मेलने पाठवण्यात आले होते. यात मुंबई पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. यावर आता सीबीआय कायदेशीर सल्ला घेत आहे. कायदेशीर सल्ला घेऊन सीबीआय या समन्सला उत्तर देणार आहे. त्यामुळे सीबीआयचे संचालक मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार नाहीत.

Subodh Kumar Jaiswal
एअर इंडियाची टाटाला विक्री ही तर 'पाँझी स्कीम'! भाजप खासदाराचा घरचा आहेर

दरम्यान, अनिल देशमुखांवरील 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सीबीआयने मागील आठवड्यात मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. कुंटे यांना ८ ऑक्टोबरला सीबीआयच्या मुंबई कार्यालयात तर पांडे यांनी ९ ऑक्टोबरला सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला होता सीबीआयने आमच्या कार्यालयात येऊन चौकशी करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर आठवडाभरातच थेट सीबीआय संचालकाना समन्स बजावण्यात आले.

Subodh Kumar Jaiswal
थेट सीबीआय संचालकांना समन्स बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलवरच 'हल्ला'

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची 25 मे रोजी सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते प्रतिनियुक्तीवर केंद्रीय सेवेत गेले हेाते. सीबीआयच्या संचालकपदासाठी तीन नावे आघाडीवर होती. त्यापैकी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी वर्णी लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com