अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला ; CBI कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर 2021 मध्ये भ्रष्ट्राचार प्रकरणात देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती.
Anil Deshmukh News, Anil Deshmukh ED Case News Updates
Anil Deshmukh News, Anil Deshmukh ED Case News Updates

मुंबई : सात महिन्यापासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयानं देशमुखांना जामीन नाकारला आहे. (Anil Deshmukh latest Marathi news)

तपास यंत्रणेचे आरोपपत्र अपूर्ण आहे आणि तपास पूर्ण झाला नसल्याचा दावा करत देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 एप्रिल 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली होती.(Political News updates)

2019 ते 2021 या कालावधीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. देशमुखांचे जवळचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचेही जामीन अर्ज कोर्टानं फेटाळले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती.

Anil Deshmukh News, Anil Deshmukh ED Case News Updates
Vijay Mallya : मल्ल्याला कोर्टाचा दणका ; 4 महिन्यांचा तुरुंगवास, 2 हजारांचा दंड ठोठावला

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर 2021 मध्ये भ्रष्ट्राचार प्रकरणात अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआच्या (cbi) ताब्यात देण्यात आले होते. सीबीआयने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनिल देशमुखांना ताब्यात घेतले होते. त्यांना 16 एप्रिलपर्यंत सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सात महिन्यापासून ते कोठडीतच आहेत.

शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी मनीलाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीने त्यांच्या घरावर छापेमारीही केली. ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in