BJP News : चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजपच्या निलंबित आमदारावर गुन्हा दाखल

Suspended BJP Mla t Raja News : सभेत त्यांनी मुस्लीमविरोधी प्रक्षोभक भाषणे केल्याचं आढळले आहे.
Suspended BJP Mla t Raja News
Suspended BJP Mla t Raja NewsSarkarnama

Suspended BJP Mla t Raja News : चिखावणीखोर भाषण केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित आमदाराच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टी राजा सिंह (BJP MLA T Raja Singh)असे या निलंबित आमदाराचे नाव आहे.

२९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित एका सभेत त्यांनी चिखावणीखोर भाषण दिले होते. याप्रकरणी दादर पोलिसांनी टी राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या वादग्रस्त विधानाने तेलगंणाचे भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह नेहमीच वादात सापडले आहेत, याबाबत त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. २९ जानेवारी रोजी दादर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी लव जिहाद आणि लँड जिहादबाबत त्यांनी घोषणा दिल्या होत्या.

Suspended BJP Mla t Raja News
Karnataka Viral Video : PM मोदींच्या फोटोचे शेतकऱ्याने घेतले चुंबन ; Video व्हायरल..

यावेळी त्यांनी चिखावणीखोर भाषण दिले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका जातीसमुहाविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. "2026 पर्यंत भारत “अखंड हिंदू राष्ट्र” होईल, असे ते म्हणाले होते.

प्रक्षोभक वक्तव्यांमुळे टी. राजा सिंह त्यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काही महिन्यांपासून राजा सिंह यांच्या महाराष्ट्रात अनेक सभा झाल्या. या प्रत्येक सभेत त्यांनी मुस्लीमविरोधी प्रक्षोभक भाषणे केल्याचं आढळले आहे.

यामध्ये श्रीरामपूर, अहमदनगर, संभाजीनगर, लातूर, सोलापूर, मलंगगड, मुंबई आदी ठिकाणी त्यांच्या प्रत्येक सभेत त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. काही वेळा टी. राजा सिंह यांच्या सभांना परवानगी मिळाली नाही.

Suspended BJP Mla t Raja News
BV Srinivas Defamation Notice: स्मृती ईराणींना 'डार्लिंग' म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या अंगलट; Video पाहा; डार्लिंग बना कर…

काही ठिकाणच्या भाषणांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले. तरीसुद्धा टी. राजा यांच्या सभा आणि भाषणं थांबलेली नाहीत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे 10 मार्च रोजी राजा सिंह यांची सभा झाली होती. या सभेनंतर श्रीरामपूर पोलिसांनी 16 मार्च रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टी राजा सिंह यांच्याविरुद्ध कलम 504 (शांतता बिघडवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करणे), कलम 506 (धमकावणे), कलम 295-A (एखाद्या धर्माविरुद्ध वक्तव्ये करून भावना दुखावणारी कृती), कलम 153-A (दोन धर्मा, वंश किंवा प्रांतांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने करणे) अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com