Jitendra Awhad resign : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्हा दाखल ; राष्ट्रवादीकडून जाळपोळ

Jitendra Awhad resign : एका 40 वर्षीय महिलेने मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Jitendra Awhad resign :राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळ आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाडांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ करण्यास सुरवात केली आहे. कळवा-मुंब्रा रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना टायर जाळले आहे. (Jitendra Awhad resign news update)

कळवा आणि ठाणे शहाराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन काल (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत एका 40 वर्षीय महिलेने मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंब्रा येथील कार्यक्रमात ही घटना घडली असल्याचे संबधित भाजप महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आव्हाडांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीलाला स्पर्श करत बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Jitendra Awhad
मोठी बातमी : Jitendra Awhad राजीनामा देणार ; टि्वटमुळे खळबळ

७२ तासात २ खोटे गुन्हे दाखल झाल्याने मी राजीनामा देत असल्याचे आव्हाडांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. "पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या ..उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत," असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे.

'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो'

कार्यक्रमांच्या निमित्ताने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदास श्रीकांत शिंदे, आव्हाड एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

कळवा पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर ते मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रवाना झाले. शिंदेंचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांना भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला आमने-सामने आले.

आव्हाडांनी त्यांना बाजूला करुन पुढे केले. यावेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केला असल्याचे त्या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

"आव्हाडांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून 'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो' असे म्हणत ढकलले, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात त्या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in