महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल ; लहान मुलांचं वादग्रस्त चित्रिकरण

लहान मुलांचं वादग्रस्त चित्रिकरण, अश्लील प्रसंग, अल्पवयीन मुलांचे नकारात्मक चित्रीकरण असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
mahesh manjrekar
mahesh manjrekarsarkarnama

मुंबई : ख्यातनाम दिगदर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘नाय वरण-भात लोणचा, कोण नाय कोणच्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या अंगलट येणार, अशी चिन्हे आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार (pocso act)दाखल करण्यात आली आहे.

मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिम पोलिसांनी मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यात लहान मुलांचं वादग्रस्त चित्रिकरण, अश्लील प्रसंग, अल्पवयीन मुलांचे नकारात्मक चित्रीकरण असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

महेश मांजरेकर यांच्या विरोधात सीमा देशपांडे यांनी पॉस्को न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या आधी देखील त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, त्यांची दखल कोणी घेतली नव्हती. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने देखील या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

'नाय वरण भात लोंच्या, कोण नाय कोणचा' या चित्रपटामध्ये लहान मुलांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्यामुळं त्यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली आहे. ज्याप्रकरणी न्यायालयानं पोलिसांना चोकशीचे आदेश दिले आहेत. हा चित्रपट मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटामध्ये लहान मुलांचचे अनेक भडक दृश्य चित्रीत करण्यात आले आहेत.

mahesh manjrekar
मलिक-देशमुख जेलमध्ये एकत्र डबा खातील ; मलिकांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर आणणार

अश्लील संवाद, चित्रिकरण यामुळे महिला आयोगानं देखील याची दखल घेतली होती. यासगळ्या प्रकरणात आता मांजरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आपण न्यायालयात जाणार असून माझे वकील त्याला उत्तर देतील, सेन्सॉर बोर्डने त्याला मंजूरी दिली असल्याची प्रतिक्रिया मांजरेकर यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिली आहे. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती-प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिले होते. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील काही वादग्रस्त दृश्यांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला आहे. याबाबत महिला आयोगाने पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ मधीलआक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकावेत,'' अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत मांजरेकरांना नोटीस पाठविली आहे. याबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे.

mahesh manjrekar
मलिकांच्या अटकेनंतर कंबोजांना तलवार दाखवणं पडलं महागात

सिनेमाचा ट्रेलर फेसबुक, युट्युब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दर्शकांसाठी वयाचे कोणतेही बंधन न ठेवता प्रसारित केला गेला आहे. अल्पवयीन मुलांसाठीही तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे, जे निश्चित नियमापलीकडचं आहे, असे आयोगाने पत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com