राणे कुटुंबियांच्या गाडीचा अपघात...

Narayan Rane Family Car Accident News : टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाला (कारला) पाठीमागून ट्रकने धडक दिली.
Narayan Rane Family Car Accident News
Narayan Rane Family Car Accident NewsSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अपघात झाला आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या पत्नीच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात झाला असून या अपघातामध्ये वाहनांचे थोडेफार नुकसान झाले आहे. मात्र राणे कुटुंबियांसह सर्वजण सुखरुप आहेत. या मार्गावर सोमवारी (ता.५ ऑगस्ट) रात्री हा अपघात झाला. या घटनेनंतर नितेश यांच्या पत्नी आणि मुलगा पुण्यात पोचले आहेत. (Narayan Rane Family Car Accident News)

राणे यांच्या पत्नी आणि मुलगा सोमवारी सायंकाळी मुंबईतून पुण्याकडे निघाले. त्यादरम्यान टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाला (कारला) पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे खळबळ उडाली. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करण्यात येत आहे. यासंदर्भात नितेश यांनी 'सरकारनामा'शी संवाद साधला. ते म्हणाले की, "कुटुंबिय पुण्याला जात होते. मार्गावर एका ट्रकची धडक बसली. मात्र, कोणालाही दुखापत झालेली नाही. कुटुंबिय पुण्यातील घरी पोचले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com