वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांबाबत संभाजी राजेंचा राज्य सरकारला इशारा

या दोन वर्षांच्या काळात राज्यात राज्यसेवा आयोगाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या.
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांबाबत संभाजी राजेंचा राज्य सरकारला इशारा
संभाजीराजे छत्रपती sarkarnama

'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा कोरोनामुळे (Covid 19) दोन वर्षात न झाल्याने सरकारने वयोमर्यादा वाढवून देण्याची घोषणा केली होती, ती तातडीने सरसकट अंमलात आणावी. अन्यथा तयारी करून बाहेर फेकले जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ शकतो,'' असा इशारा संभाजी राजे छत्रपती (Sabhaji Raje chatrpati) यांनी दिला आहे.

राज्यासह देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने थैमान घातले होते. या काळात सर्व व्यवहार, शाळा, महाविद्यालयेही बंद होती, कोरोनाच्या या दोन वर्षांच्या काळात राज्यात राज्यसेवा आयोगाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. या काळातही सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून परीक्षेची तयारी करणारे लाखो उमेदवार मन लावून अभ्यास करत होते. मात्र या दोन वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निघून गेली आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याच्या दोन संधी आयोगाने सरसकट उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती
`नितीन राऊत यांनी नौटंकी बंद करावी... `

तर, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील उमेदवारांच्या मागणीची दखल घेतल्याचे दिसत आहे. 'कोरोना काळात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा पार झालेल्या उमेदवारांना नोकरभरतीच्या नवीन जाहिरातीत अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी आज मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.' असे ट्विट मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

तसेच, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदेखील उमेदवारांना परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवून देण्याची विनंती राज्यसरकारकडे केली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या. आता नव्याने जाहीराती येत आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांना परीक्षेसाठी वाढीव संधी मिळावी, अशी मागणी दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

दरम्यान कोरोना महामारी काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्‍त पदांमुळे पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती होऊनही निकाल प्रलंबितच राहिला. त्यानंतर मराठा समाजाचे "एसईबीसी'चे आरक्षण रद्द झाल्याने पुन्हाउमेदवारांसमोरील अडचणी वाढतच गेल्या. त्यामध्येच दोन वर्षे निघून गेली.

निकालाच्या प्रतीक्षेत शेवटी स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. त्यानंतर राज्यसरकारने "एमपीएससी'च्या सर्व जागा भरणार, आयोगामार्फत मोठी पदभरती करणार, अशा एक ना अनेक वल्गना करण्यात केल्या. दुसरीकडे, उमेदवारांना परीक्षेच्या सहा संधी देण्याचा निर्णय मात्र, यावेळी आवर्जून लागू करण्यात आला.

त्यानंतरही आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सरकारने 15 दिवसांत कार्यवाही करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली, त्याच पद्धतीने सरकारने पुन्हा अधिसुचना काढून विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवावी, तसेच, आणखी जागा वाढवून उर्वरित पदांचीही भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशा मागण्या उमेदवारांनी केल्या होत्या. आधीच पदभरतीसाठी होणारा उशीर आणि आता अभ्यास करुनही केवळ वयोमर्यादा उलटून गेल्यामुळे परीक्षला बसता न आल्याने विद्यार्थ्यांचा रोष पत्कारावा लागू नये म्हणून सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.