अंधेरी पूर्वचा प्रचार थंडावला; पण भाजपच्या भूमिकेमुळे ठाकरे गटासमोर नवे आव्हान

Andheri East by-election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपला आहे.
Rituja Latke
Rituja Latkesarkarnama

Andheri East by-election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची धामधुम आज थांबली. या पोट निवडणुकीसाठी येत्या तीन नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, भाजपच्या (BJP) भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्यासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ठाकरे गटाच्या उमेदवाराचा नोकरीचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप झाला. तर राजीनामा मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले होते. लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे यासाठी विविध राजकीय पक्षांनी भाजपला केलेली विनंती या सगळ्या प्रकारामुळे अंधेरी पोट निवडणुकीत चांगलीच रंगत आली.

Rituja Latke
पुण्यासाठी राज ठाकरेंची नवी रणनिती; तब्बल साडेतीन हजार ‘राजदूत’ !

भाजपच्या अधिकृत उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असतानाच एकूण सहा अपक्ष उमेदवार मैदानात टिकून राहिले. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला नव्यानेच मिळवलेली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी लागल.

मात्र, प्रचारामध्ये भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन करत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पटेल यांनी माघार घेतली. पटेल यांच्या माघारीमुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे, असा संदेश मतदारांमध्ये गेला. त्यामुळे ठाकरे गटाला निवडणूक होणार आहे, असा प्रचार जास्त करावा लागला.

भाजपने माघार घेतली असली तरी निवडणूक होणार आहे हेच मतदारांना अधिक सांगावे लागले. तसेच गुरुवारी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढतानाही ठाकरे गटाला मोठी कसरत करावी लगणार आहे. त्यामुळे भाजपने माघार घेण्यासाठी केलेला उशीर आणि अनिल परब यांनी नोटा बटन दावा असा प्रचार मतदार संघात होत आहे, असा आरोप आज केला. त्यामुळे ठाकरे गटाची लढाई अजूनही सोपी नाही. भाजपने घेतली आहे त्यामुळे लटके यांना विक्रमी मतांनी निवडणून आण्याची संधी ठाकरे गटाला असली तरी त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Rituja Latke
नड्डा, शहांचा आदेश डावलला; भाजपच्या पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

तब्बल 2 लाख 71 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यापैकी एक लाख 46 हजार 685 पुरुष मतदार तर एक लाख चोवीस हजार 816 स्त्री मतदार असून एक तृतीय पंथीय मतदाराचा देखील समावेश असणार आहे. 103 मतदार हे अनिवासी असून दिव्यांग मतदारांची संख्या देखील 429 इतकी आहे. सेवाधारक 419 मतदार ८० वर्ष व अधिक वय असणारे 7504 मतदार ईटीपी बी एस 29 मतदार व प्रथमच मतदान करणारे 243 नवतरुण मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com