शिंदे सरकारचा आता खरा कस लागणार; मंत्रिपदं देताना ही समीकरणं ठरणार महत्वाची

अपात्रतेच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी शक्यता आहे.
CM Eknath Shinde Latest News, Devendra Fadanvis Latest News
CM Eknath Shinde Latest News, Devendra Fadanvis Latest NewsSarkarnama

मुंबई : शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर लगेचच विरोधकांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. शिवसेनेतील (Shiv Sena) 40 बंडखोर आमदारांसह भाजपच्या (BJP) 106 आणि अपक्षांना अडीच वर्ष सांभाळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा कस लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक समीकरणांचा विचार करणं महत्वाचं ठरणार आहे. (CM Eknath Shinde Latest News)

शिंदे सरकारने आता काम सुरू केले असून आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात पुढील काळात यश मिळवून देणारा कारभार करणारे सरकार तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. मंत्री निवड काटेकोरपणे करावी लागणार असून त्याबाबत कोणतीही घाई करायची नाही, असे ठरले असल्याचे समजते. येत्या काही महिन्यातच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सरकारची परिक्षा पाहणाऱ्या ठरणार आहेत.

CM Eknath Shinde Latest News, Devendra Fadanvis Latest News
टायगर अभी जिंदा है! शहाजी पाटील अजितदादांसह राऊतांवर तुटून पडले

शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांवर मात करून निवडणुका जिंकणे आवश्यक असल्याने यासंदर्भात कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी भाजप श्रेष्ठीकडून घेतली जाणार असल्याचे समजते. मतदारसंघ, जातीय समीकरणे तसेच स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षम चेहरे देण्यावर भाजपचा भर असेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे सेनेतील 40 बंडखोर आणि भाजपचे १०६ आमदार सामावून घेत पुढच्या अडीच वर्षांचा कारभार करायचा असल्याने ही प्रक्रीया काळजीपूर्वक होईल, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

शिंदे यांच्या समवेत आलेले सहा मंत्री बंडखोर झाल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार आहे. शिवाय प्रत्येक आमदार स्वतंत्रपणे बाहेर फुटून आल्याने त्याच्या मागण्याही समजून घ्याव्या लागतील. शिंदे गटातील विधिमंडळातील अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक आमदार महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी घ्यावी लागणार आहे.

CM Eknath Shinde Latest News, Devendra Fadanvis Latest News
शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर पडायचे : अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

पूर्वी सहा ते सात आमदार घेवून बाहेर पडणारे नेते असत. या बंडात तसे नसल्याने प्रत्येकाची काळजी घेणे भाग आहे. शिवाय नव्यांना सामावून घेतानाच जुन्यांवर अन्याय नको, हेही तत्व ध्यानात घ्यावे लागेल, असे शिंदे गटाच्या एका नेत्याने स्पष्ट केले. विश्वासमत प्राप्त करेपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करता आली नव्हती, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. येत्या एकदोन दिवसात शिंदे आणि फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. न्यायालयातील अपात्रतेची सुनावणी सुरु होईपर्यंत मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार नसल्याचेही बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com