Cabinet Expansion : निकाल लागला; इच्छुक आमदारांचा आनंद गगनात मावेना, आता रस्सीखेच मंत्री होण्यासाठी !

Cabinet Expansion Of Maharashtra Government : शिंदे गटाच्या नेत्यांचा आनंदाला पारावार उरला नाहीस मंत्रिपदाचे वेध..
Cabinet Expansion Of Maharashtra :
Cabinet Expansion Of Maharashtra : Sarkarnama

Cabinet Expansion Of Maharashtra Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढतानाच, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेचं सरकार पूर्वरत केलं असते, असे न्यायालयाने म्हंटले आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

Cabinet Expansion Of Maharashtra :
Supreme Court Hearing : गोगावलेंचा व्हिप बेकायदेशीर ठरवल्याने ठाकरेंच्या 15 जणांची आमदारकी वाचली !

शिंदे-फडणवीस सरकार तूर्तास तरी कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारातील मंत्रिमंडळ विस्तार अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना आणि भाजप (BJP) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ मे नंतर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती यापूर्वीच असे वृ्त्त आले होते.

Cabinet Expansion Of Maharashtra :
Shahaji Patil Reaction : शहाजीबापूंची तिखट प्रतिक्रिया : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ..राऊतांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ...’

पहिल्या मंत्रिमंडळात शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. आता शिंदे गटाकडून आमदार बच्चू कडू, आमदार संजय शिरसाट, प्रतोद भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव, आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. यांच्यासह १९ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे

Cabinet Expansion Of Maharashtra :
Ambadas Danve On Court Decision : सोळा आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष नियमाने, कायद्याने निर्णय घेतील अशी अपेक्षा..

दरम्यान, आज सत्तासंघार्षाचा निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार याचं टायमिंग जुळून येणार का? याबाबत चर्चा होत होती. मात्र आता मंत्रिमंडळाचा निर्णय होणे, अपेक्षित आहे. भाजप व शिंदे गटातील आमदारांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत. १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकींचा निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in