Bharat Gogawale : शिंदे मंत्रिमंडळात रायगडच्या भरत गोगावलेंना संधी

Cabinet Expansion | Bharat Gogawale| भरत गोगावले महाडचे आमदार आहेत.
Bharat Gogawale
Bharat Gogawale

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज (९ ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होत आहे. आज सकाळी स. ११ वा. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडणार आहे. शिंदे गट आणि भाजपचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे नऊ आणि भाजपचे 9 मंत्र्यांचा आज शपथविधी होईल.

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत, संदीपान भुमरे, शंभूराज देसाई यांच्यासह भरत गोगावले यांचेही नाव समोर आले आहेत. त्यामुळे गोगवलेंना आजच्या मंत्रिमडळात संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे. भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रतोद आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवेसनेचे प्रतोद सुनील प्रभु यांचे प्रतोदपद फेटाळून भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली.

Bharat Gogawale
Cabinet Expansion : आज मुहूर्त मंत्रिमंडळ विस्ताराचा

सुरुवातीपासून गोगावले यांची आक्रमकता समोर आली आहे. गेल्या आठवड्यातही उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्यानंनतर भरत गोगावले यांनी तुमच्याही गाड्या आहेत, असा इशारा हल्लेखांना दिला होता. हल्लेखोर कोण आहेत, याचा शोध पोलिस नक्की घेतील. कोणीही परत असे कृत्य करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

भरत गोगावले महाडचे आमदार आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांमध्ये गोगावले हेदेखली एक आहेत. सरपंच ते आमदार आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा भरत गोगावलेंचा प्रवास आहे. 1992-93 पासून ते शिवसेनेशी जोडले गेले. त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमध्येही ते त्यांच्यासोबत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com