Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंचं सरकार बचावल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाट म्हणाले...

Maharashtra Cabinet Expansion : २० जणांना मंत्रिपद मिळणार ?
Cabinet Expansion : Sanjay Shirsat
Cabinet Expansion : Sanjay ShirsatSarkarnama

Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेचं सरकार पूर्वरत केलं असतं, असे न्यायालयाने म्हंटले आहे. त्यामुळेच राज्यात आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे. (Sanjay Shirsat said about cabinet expansion Maharashtra Statement)

Cabinet Expansion : Sanjay Shirsat
Shinde vs Thackeray ; निकाल आला, मेगा घडामोडी घडणार, राजकारण पेटणार LIVE । Supreme court verdict

न्यायालयाच्या निर्णयामुळे जरी शिंदे सरकार तूर्तास बचावले असले तरी, शिंदे सरकारच्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर कठोरे तोशेरे ओढले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आले आहे. असे असले तरी तूर्त तरी शिंदे सरकार बचावले आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिरसाट म्हणाले, आता सरकारचं पूर्ण मंत्रिमंडळ बनणार आहे. आणखी २० आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. या सर्वांना मंत्रिपदासाठी संधी दिली जाईल." स्वतः आमदार संजय शिरसाटही मंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.

Cabinet Expansion : Sanjay Shirsat
Arvind Kejriwal News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवाल अ‍ॅक्शन मोडवर; घेतला मोठा निर्णय

शिंदे-फडणवीस सरकार तूर्तास तरी कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारातील मंत्रिमंडळ विस्तार अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना आणि भाजप (BJP) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ मे नंतर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती यापूर्वीच असे वृ्त्त आले होते.

Cabinet Expansion : Sanjay Shirsat
Mohol Bazar Samiti : सोलापूर जिल्ह्यातील एकमेव बिनविरोध झालेल्या मोहोळ बाजार समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे धनाजी गावडे

पहिल्या मंत्रिमंडळात शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. आता शिंदे गटाकडून आमदार बच्चू कडू, आमदार संजय शिरसाट, प्रतोद भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव, आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. यांच्यासह १९ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com