शिवसैनिकांमध्ये आपापसात भांडणं लावून...; अनिल परबांनी सांगितला भाजपचा डाव

Anil Parab news| BJP| आपल्याला लोकांची काम करुन लोकांना जिकांयचयं
Anil Parab news, BJP News Updates, Shivsena News
Anil Parab news, BJP News Updates, Shivsena News

मुंबई : ''भाजप स्वत:त आपल्याशी लढत नाही. आधी त्यांनी मनसेला आपल्या विरोधात लढवलं, नारायण राणेंना आपल्या विरोधात लढवलं, आता ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या विरोधात लढवत आहे. म्हणजे, तुम्ही आपापसात लढा, आपापसात भानगडी करा,मारामाऱ्या करा, आम्ही तुमची मजा बघतो, कसे तुम्ही एकमेकांविरोधात लढताय,'' असा खुसाला शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. (Anil Parab Latest Marathi news)

मुंबईत आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ''म्हणजे मराठी माणसाने मराठी माणसाची डोकी फोडायची आणि हे त्याची मजा बघणार, मला तुम्हाला एकच सांगायचं मला रस्त्यावरच्या लढाया नकोत, आपल्याला लोकांची काम करुन लोकांना जिकांयचयं,''असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.(Shivsena Latest Marathi News)

Anil Parab news, BJP News Updates, Shivsena News
Latur : औसा पॅटर्न राज्यभर राबवण्याची अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुखांनी सगळा खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे याबाबतीत दोन दिवसात निर्णय होतील असं त्यांनी सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील आणि ते आपली अधिकृत भूमिका कळवतील.

बंडखोर आमदार दिलीप लांडेंबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'चांदिवली विधानसभेच्या आमदार दिलीप लांडे यांना मी शिवसेनेत आणलं होतं. शिवसेनेने त्यांना प्रेम दिलं त्यांची सगळी काम केली, पण ते का गेले याच कारण अजूनही कळलेलं नाही. असं कुठलंही कारण त्यांना जाण्यासारखं नव्हतं, असं त्यांनी सांगितले. शिवसेनेचं चिन्ह असं दूसऱ्या कोणाकडे जाऊ शकत नाही, चिन्हाचा विषय निवडणूक आयोगाकडे आहे, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in