परदेशात गेलेले क्षितिज ठाकूर मुंबईत दाखल; 'बविआ'ची तीन मतं ठरणार निर्णायक

सर्वच पक्षाच्या नेत्यांनी 'बविआ'च्या नेत्यांची भेट घेतली आहे.
MLA Kshitij Thakur Latest Marathi News, MLA Hitendra Thakur Latest Marathi News
MLA Kshitij Thakur Latest Marathi News, MLA Hitendra Thakur Latest Marathi NewsSarkarnama

(MLC Election 2022 Latest News)

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीसाठीही (Legislative Council Election) बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांचा भाव वाढला आहे. त्यातच आघाडीचे एक आमदार क्षितिज ठाकूर मागील आठवड्यात परदेशात गेल्याने ते मतदानाला येणार की नाही, याबाबत धाकधुक होती. पण ठाकूर हे सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाल्याचे समजते.

'बविआ'चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. त्यांच्याकडे तीन मतं आहेत. क्षितिज ठाकूर हे परदेशात गेले होते. त्यामुळे ते मतदानासाठी येणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. या एक मताचा फटका कुणाला बसणार, याबाबतही चर्चा सुरू होत्या. पण ठाकूर सकाळीच मुंबईत दाखल झाले असून आता त्यांचं मत कुणाला जाणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

MLA Kshitij Thakur Latest Marathi News, MLA Hitendra Thakur Latest Marathi News
विधान परिषद निवडणूक : राज्यसभेची पुनरावृत्ती होणार की आघाडी भाजपला धूळ चारणार?

राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सेफ

दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी खरी लढत असली तरी प्रत्यक्षात भाई जगताप विरूध्द लाड असा हा सामना रंगणार आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही 'सेफगेम' खेळला जात आहे. सगळी गणितं लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं अतिरिक्त मतं जमवली आहेत. काल एमआयएमच्या एका आमदाराचं मत राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता समाजवादी पक्षाचंही एक मत पारड्यात पाडण्यात पक्षाला यश आल्याचं समजतं.

निवडणुकीत सर्वच पक्षांसाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी आपण एकनाथ खडसे यांना मतदान करणार असल्याचे काल जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम पसंतीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन कमी झाले होते.

MLA Kshitij Thakur Latest Marathi News, MLA Hitendra Thakur Latest Marathi News
भाजपच्या किमान 9 मतांना राष्ट्रवादी लावणार सुरुंग; प्रसाद लाड यांचा पराभव निश्चित?

त्यातच आता समाजवादी पक्षाचंही एक मत राष्ट्रवादी मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे निंबाळकर आणि खडसे हे दोघेही सेफ झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. पण दुसरीकडे काँग्रेसला आता आणखी धावाधाव करावी लागणार आहे. एमआयएम आणि समाजवादीची प्रत्येकी दोन-दोन मतांसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते.

आता काँग्रेसला एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येक एकच मत मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. रविवारी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांनी समाजवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. पण काँग्रेसला एकच मत देणार असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे.

MLA Kshitij Thakur Latest Marathi News, MLA Hitendra Thakur Latest Marathi News
भाजपचे 9 की 13 आमदार संपर्कात? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना आठ मतांची गरज आहे. एमआयएम आणि समाजवादीची दोन मतं मिळणार असली तरी आणखी सहा मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यामुळे आता अपक्ष व इतर घटक पक्षांवरच काँग्रेसची मदार असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com