एक मंत्रीही भेटायला आला नाही! निवडणुकीच्या 24 तास आधी ठाकूरांनी टाकला बॉम्ब

बहुजन विकास आघाडी अन् शिवसेनेतील संघर्ष जुनाच
एक मंत्रीही भेटायला आला नाही! निवडणुकीच्या 24 तास आधी ठाकूरांनी टाकला बॉम्ब
Hitendra Thakur Sarkarnama

मुंबई : राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) उद्या (ता.१०) मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मतदानासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. यामुळं महाविकास आघाडीला दोन मते कमी पडणार आहेत. आता या निवडणुकीच्या चाव्या बहुजन विकास आघाडीकडे (बविआ) गेल्या आहेत. यावर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेला इशारा दिल्यानं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत स्थानिक पातळीवर संघर्ष सुरू आहे. शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांचे संबंधही ताणलेले आहेत. यातच आता राज्यसभा निवडणुकीमुळं ठाकूर यांचं राजकीय वजन वाढलं आहे. राज्यसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत बोलताना भाई ठाकूर म्हणाले की, आमची मते घेण्यासाठी आमदार, माजी खासदार हे आमच्याकडे आले. मात्र, जवळच्या मंत्रिमंडळातला एकही मंत्री भेटीसाठी आला नाही. उद्या ४ वाजेपर्यंत मतदान आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी आम्ही मतदान करणार आहोत.

Hitendra Thakur
राज्यसभेच्या चाव्या ठाकूरांच्या हाती! 'बविआ'च्या तीन आमदारांची मतं ठरणार निर्णायक

राज्यसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाली आहेत. यामुळे मतांचा कोटा होणार आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या चाव्या आता बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेल्या आहेत. ठाकूर यांचे तीन आमदार असून, त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. यातच ठाकूर यांनी आपल्या आमदारांना शेवटच्या क्षणी मतदान करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं हे आमदार कुणाच्या पारड्याच वजन टाकणार हे स्पष्ट झालेलं नाही.

Hitendra Thakur
वादग्रस्त भाजप नेत्यांना अजित दोवाल शिकवणार धडा! इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिला शब्द

ठाकूर यांची मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाकूर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. याचबरोबर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली होती. यानंतर शिवसेनेचे नेतेही ठाकूर यांना भेटले होते. ठाकूर आणि शिवसेनेचे संबंध आधीपासून ताणलेले आहेत. त्यामुळे पवारांची शिष्टाई कितपत यशस्वी होते, हे उद्याच स्पष्ट होईल.

देशमुख आणि मलिक यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतांचा कोटा कमी झाली आहे. या आधी ४१. १४ चा मतांचा कोटा होता. आता ४०. ७१ चा मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे भाजपला १ मता फायदा होणार आहे. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज होती. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज लागणार आहे. यामुळे शिवसेनाला १ मलाताचा तोटा सहन करावा लागणार आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या आणि भाजपच्या तिसऱ्या उमेदवारासाठी एक-एक मत महत्त्वाचे असताना महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in