'बल्क ड्रग पार्क' प्रकल्पही महाराष्ट्रातून घालवला : आदित्य ठाकरेंचा शिंदे - फडणवीसांवर आरोप

Aditya Thackeray : जितकर भी हारने वाले को खोके सरकार कहते है, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.
Eknath Shinde, Aditya Thackeray Latest News
Eknath Shinde, Aditya Thackeray Latest Newssarkarnama

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असतानाच आता शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे - फडवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कालच वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा मोठा प्रकल्प गुजरातने पळवण्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी आणखी एक मोठा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगड जिल्ह्यात होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी यांनी केला आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांची सबसिडी मिळून वेदांत आणि फॉसकॉन इन्वेस्टमेंट थोडी सांगड घालणं गरजेची होती. याबाबत चर्चा पुढे गेली होती. जूनमध्ये भेट घेतली. आपलं सरकार चाळीस गद्दारांनी पाडलं. यामुळे हा विषय मागे राहिला, असं म्हणत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही केले होते. सुभाष देसाई यांनी प्रस्ताव आणला होता. मात्र, केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क सुरु होणार आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Eknath Shinde, Aditya Thackeray Latest News
वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ : उद्योगमंत्री सामंतांचा विश्वास

महाराष्ट्रातील एक लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही याची जबाबदारी कोण घेणार आहे. याचे उत्तर मिळणार आहे का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. प्रकल्प कसा गेला याचा खुलासा का झालेला नाही ? असे म्हणत जितकर भी हारने वाले को खोके सरकार कहते है, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com