खासदार जाधवांना शिवसेनेचा दणका; ठाकरेंनी केली हकालपट्टी

प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत
MP Prataprao Jadhav
MP Prataprao JadhavSarkarnama

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांपाठोपाठ आता खासदारांवर कारवाई सुरु झाली आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची शिवसेना (shivsena) जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह एक जिल्हा प्रमुख, 2 उपजिल्हा प्रमुख, 3 तालुका प्रमुखांनाही पक्षातून काढण्यात आले आहे.

शिवसेनेचे आमदार फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. त्यानंतर खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला लागले. बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांनी आधीच शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर जाधव हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

MP Prataprao Jadhav
Smriti Irani : भाजप मंत्री स्मृती इराणींच्या समर्थनार्थ शिवसेना खासदार मैदानात

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामधून जाहीर करण्यात आले आहे. जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याने पक्ष विरोधी कारवाया करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरून जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. जाधव यांच्या जागेवर वसंतराव भोजने यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

MP Prataprao Jadhav
आदित्य ठाकरेंनी हात उंचावला अन् शिर्डीत शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार ठरला?

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटांच्या ४० आमदारांची मुंबईमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत शिवसेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्यात जाधव यांचा समावेश होता. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in