Budget Session : सामंतांचा ठाकरेंना थेट इशारा : 'शिवसेना काय आहे ते निवडणुकीत दाखवूच'

Uday Samant to Uddhav Thackeray: "स्वायत्त संस्थांवर आक्षेप घेणं चुकीचं.."
Budget Session : Uddhav thackeray : Shivsena
Budget Session : Uddhav thackeray : ShivsenaSarkarnama

Shivsena News : आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) सुरू होत आहे. विरोधी पक्ष सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान अधिवेशनापूर्वी विधिमंडळ सभागृहा बाहेरच सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप, टिका टिपण्णी सुरू झाली आहे. शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाला इशाराच दिला आहे.

Budget Session : Uddhav thackeray : Shivsena
Maharashtra Budget : व्हीपवरुन अधिवेशन गाजणार ; ठाकरे गटाने शिवसेनेला दिला 'हा' इशारा

सामंत म्हणाले, "व्हीपचे निर्देश दोन आठवड्यांसाठी असेल, त्यामुळे हा व्हीप काढून कारवाईचा काही प्रश्न येत नाही. शिवसेनेचे आमदार विधिमंडळात अधिवेशनासाठी उपस्थितराहावं, आमचे प्रतोद भरत गोगावले यांनी तो व्हीप काढलेला आहे. व्हीपचा मुद्द्याचा बाऊ करण्यामध्ये अर्थ नाही."

"स्वायत्त संस्थांवर आक्षेप घेणं, हे चुकीचं आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. काही निर्णय स्वीकारायला शिकलं पाहिजे, आकांडतांडव करून उपयोग नाही. सगळे परिपक्व राजकारणी शिवसेनेत काम करतात, शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलं समन्वय आहे. लोकसभेला आम्ही भरघोस यश मिळवू. आम्ही पुन्हा सत्ताधारी म्हणून विधिमंडळात येणार आहोत, " असे ही सामंत म्हणाले.

Budget Session : Uddhav thackeray : Shivsena
Congress News : काॅंग्रेसला महिला शहराध्यक्ष मिळेना..

"ठाकरे गटात जे शिल्लक राहिलेले आमदार आणि पदाधिकारी आहेत, त्यांना मनोबल देण्यासाठी आमचं सरकार कोसळणार असं स्क्रिप्ट त्यांच्याकडून लिहलं जातंय. याच्यासंदर्भात अधिक बोलणं योग्य नाही, निवडणुका येतील आम्ही सुद्धा तयार आहोत. शिवसेना काय आहे, बाळासाहेबांची शिवसेना काय आहे? निवडणुकीत आम्ही दाखवून देवू, असा इशाराच सामंत यांनी ठाकरेंना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com