Maharashtra Politics: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा मोठा डाव : विधानपरिषद शिवसेनेवर ताबा मिळवण्याच्या हालचाली!

Maharashtra Budget : उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहीत ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
Uddhav Thackeray Eknath Shinde | Nilam Gorhe
Uddhav Thackeray Eknath Shinde | Nilam GorheSarkarnama

Shivsena News : विधानसभेत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाने ठाकरे गट समर्थक आमदारांना व्हीप बजावल्यानंतर आता विधान परिषद शिवसेना पक्षावरही हक्क सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हालचाली सुरू केल्या आहेत. विधान परिषद शिवसेना पक्षाचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र लिहले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव मंजूर करण्यातआल्याचे शिंदेंच्या या पत्रात नमूद केले आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde | Nilam Gorhe
Exit Polls 2023 : एक्झिट पोलचा अंदाज : त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपला बहुमत तर मेघालयमध्ये त्रिशंकू

पक्षाचा प्रतोदाची नेमणूक झाल्यानंतर शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका, पक्षाचे आदेश घेण्याचा मार्ग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मोकळा होणार आहे. यानंतर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील विधान परिषद आमदारांनाही नव्या प्रतोदाचा व्हीप व आदेशाचे नियमानुसार पालन करावे लागणार आहे. शिंदेंचा व्हीप मान्य करावा लागणार आहे, अन्यथा कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या सदस्यांवर वर्चस्व राखण्यासाठी हा शिंदेंचा मोठा डाव मानण्यात येतो.

Uddhav Thackeray Eknath Shinde | Nilam Gorhe
Maharashtra Budget : शिवसेना-भाजपची पुढील रणनिती तयार; गोगावले म्हणाले...

शिवसेना विधिमंडळ पक्षाची काल बैठक पार पडली. या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे पत्रात केले सूचित केले आहे.यामुळे आता विधानसभेपाठोपाठ एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत शिवसेना विधीमंडळ पक्षावर अधिकार मिळवण्याच्य दृष्टीने, एकनाथ शिंदेंनी हा मोठा डावपेच खेळल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com